या चार प्रकारे घरी बनवा साबुदाणा रेसिपी, जाणून घ्या सर्व काही

| Updated on: Apr 20, 2021 | 10:48 AM

हे एक मल्टीफॅसिटिड इनग्रेडिएंट आहे जे चवदार आणि हलके डिश तयार करण्यासाठी अनेक प्रकारे शिजवले जाऊ शकते. मग ते खीर, कबाब, खिचडी किंवा टिक्की असो. (Homemade Sago Recipes in These Four Ways, know Everything about it)

या चार प्रकारे घरी बनवा साबुदाणा रेसिपी, जाणून घ्या सर्व काही
या चार प्रकारे घरी बनवा साबुदाणा रेसिपी
Follow us on

मुंबई : बाजारात खाद्यपदार्थ बनविण्यासाठी अनेक साहित्य उपलब्ध आहेत. ज्यांच्याद्वारे आपण बर्‍याच प्रकारचे पदार्थ बनवतो आणि आपल्या कुटुंबाला, मित्रांना ट्रीट देतो. लोक नेहमी तात्काळ काहीही बनवण्यासाठी साहित्य शोधत असतात. त्यांना 5 मिनिटांत तयार होणारी डिश बनवायची असते किंवा 10 मिनिटांपेक्षा अधिक वेळ न लागणारी रेसिपी बनवण्यासाठी ते बाजारात नवीन वस्तू शोधत असतात. तथापि, अशा बऱ्याच गोष्टी बाजारात सहज सापडतात पण आपण ज्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे साबुदाणा. साबुदाणा, ज्याला साबुदाणा किंवा टॅपिओका मोती म्हणून देखील ओळखले जाते. हे एक स्वास्थ इनग्रेडिएन्ट आहे जे पोषक तत्वांनी समृद्ध आहे. हे कर्बोदकांनी समृद्ध आहे आणि बर्‍याचदा धार्मिक उपवासाच्या दिवशी खाल्ले जाते. ते टॅपिओका मूळापासून बनवले जाते आणि पारदर्शक लहान बॉलसारखे दिसतात. हे एक मल्टीफॅसिटिड इनग्रेडिएंट आहे जे चवदार आणि हलके डिश तयार करण्यासाठी अनेक प्रकारे शिजवले जाऊ शकते. मग ते खीर, कबाब, खिचडी किंवा टिक्की असो. (Homemade Sago Recipes in These Four Ways, know Everything about it)

साबुदाणा खिचडी

उकडलेले बटाटे, किसलेले आले आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदे घाला. त्यात थोडे मीठ, तिखट आणि लिंबाचा रस मिसळा. कोथिंबीरसह गार्निश करुन तुमची स्वादिष्ट साबूची खिचडी तयार होईल.

साबुदाणा वडा

हा पूर्ण आणि गिल्ट-फ्री संध्याकाळचा नाश्ता बनवण्यासाठी, भाजलेले शेंगदाणे, चिरलेली हिरवी मिरची, चिरलेली कांदे, उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे घालून भिजवलेल्या साबुदाणामध्ये फक्त मिक्स करावे. थोडीशी लाल तिखट आणि मीठ घालून हे मिश्रण लहान तुकडे करा आणि तेलात तळा.

साबुदाणा खीर

या डिशसाठी एका पॅनमध्ये 1 कप दूध घ्या आणि त्यात साबूदाणा मिक्स करावे. साखर, वेलची पावडर आणि केशर मिक्स करावे. मध्यम आचेवर शिजू द्यावे. लक्षात ठेवा हे जळले नाही पाहिजे म्हणून 5 मिनिटे ढवळत रहा. आता गरमा गरम सर्व्ह करा.

साबुदाणा चिवडा

थोडेसे शेंगदाणे, काजू आणि मनुका तेलात हलके भाजून घ्या. एका भांड्यात हे तळलेले शेंगदाणे आणि साबुदाणा एकत्र करा आणि त्यात थोडे मीठ, लाल तिखट आणि चिमूटभर साखर घाला. चांगले मिसळा आणि हवाबंद डब्यात ठेवा. (Homemade Sago Recipes in These Four Ways, know Everything about it)

इतर बातम्या

नागपुरात ‘या’ दोन वीज केंद्रांमध्ये ऑक्सिजन प्लांटची शक्यता तपासा, मुख्यमंत्र्यांच्या ऊर्जामंत्र्यांना सूचना

India Corona Update : सर्वसामान्य नागरिकांसाठी 48 तासांत केंद्र सरकारचे 5 मोठे निर्णय, वाचा सविस्तर