AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty Tips : उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात? तर आजच घरी तयार करा मध, दही आणि आंब्याचा फेसपॅक !

आंबा खायला प्रत्येकालाच आवडतो. तसेच आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Beauty Tips : उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात? तर आजच घरी तयार करा मध, दही आणि आंब्याचा फेसपॅक !
फेसपॅक
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 10, 2021 | 7:02 AM
Share

मुंबई : आंबा खायला प्रत्येकालाच आवडतो. तसेच आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, आंबा आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या निरोगी त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. आज आम्ही तुम्हाला आंब्यापासून तयार होणारा एक फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा चांगली होण्यास मदत होईल. (Honey, Curd and mango face pack are beneficial for the face)

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, उन्हाळ्यात त्वचा अधिक तेलकट होते. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरुम येतो. मात्र, जर आपण आंब्याचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावला तर चेहऱ्यावरील तेलकटपणा आणि मुरुमाची समस्या दूर होण्यास मदत होईल. या फेसपॅकमुळे त्वचेतील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी मध, दही आणि आंब्याचा रस लागणार आहे.

दोन चमचे आंब्याचे रस, एक चमचा मध आणि एक चमचा दही एकत्र चांगले मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर साधारण 20 मिनिटे ठेवा आणि चेहरा पाण्याने धुवा. ही पेस्ट आठवड्यातून साधारण दोन ते तीन वेळा लावली पाहिजे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर होईल. आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो.

आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.‘व्हिटामिन बी6’ मुळे रक्तातील ‘होमोसेस्टीना’चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो. आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत होते. दहीमध्ये एक लॅक्टिक अॅसिड असते. ज्यामुळे त्वचेचे संरक्षण होते. तसेच, उन्हाळ्याच्या हंगामात, त्वचेवर परिमाण होत असतो.

दहीमध्ये लिंबाचा रस घाला आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावल्यास उन्हापासून चेहऱ्याचे संरक्षण होते. त्वचेला आराम मिळतो आणि त्वचा साफ होते. तसेच, केसांमधील डान्ड्रफची समस्या काढून टाकण्यात दही देखील उपयुक्त आहे. डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे फायदेशीर ठरते. यासाठी केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे. दह्यामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. दह्यामध्ये दुधासारखेच पोषक घटक असतात. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

संबंधित बातम्या : 

(Honey, Curd and mango face pack are beneficial for the face)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली