बदाम खाण्याचे आहेत खूप फायदे, पण दररोज किती खाल्ले तर होईल जास्त उपयोग? जाणून घ्या सविस्तर
बदाम हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे, पण जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. योग्य प्रमाणात बदाम खाल्ल्याने हृदय, मेंदू आणि पचनासाठी फायदेशीर परिणाम होतो. पण किती प्रमाणात बदाम खाल्ले पाहिजे? जाणून घ्या सविस्तर.

आपण लहानपणापासून ऐकत आलोय की “बदाम खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते!” पण खरंतर बदाम हे फक्त स्मरणशक्तीसाठीच नव्हे, तर संपूर्ण शरीरासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. बदामामध्ये प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व घटक शरीराच्या एकंदर आरोग्यासाठी आवश्यक असतात. विशेष म्हणजे बदाम नियमितपणे योग्य प्रमाणात खाल्ले, तर वजन न वाढवता आरोग्य सुधारते.
दररोज किती बदाम खावेत?
तज्ज्ञांच्या मते, दिवसाला ५० ग्रॅम बदाम खाल्ल्यास शरीराला भरपूर फायदे मिळतात. हृदय, मेंदू, त्वचा आणि पचनक्रिया यावर याचा चांगला प्रभाव पडतो. सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाल्ले, तर त्याचा परिणाम आणखी चांगला होतो.
बदाम खाल्याचे आरोग्यावर होणारे फायदे
दररोज बदाम खाल्याने हृदय निरोगी राहते, कारण त्यातील ओमेगा-३ फॅटी ऍसिड रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
स्मरणशक्ती वाढवण्यास बदाम अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांसाठी व ऑफिसमध्ये मेंदूचा वापर करणाऱ्यांसाठी बदाम म्हणजे नक्कीच सुपरफूड!
पचनक्रिया सुधारणे, त्वचेवरील पिंपल्स आणि ऍलर्जी कमी होणे हेही बदाम खाल्याने शक्य होते.
दररोज बदाम खाल्याने शरीरात हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, त्यामुळे अॅनिमिया टाळता येतो.
वर्कआउटपूर्वी किंवा नंतर बदाम खाल्ल्यास शरीराला अधिक ऊर्जा मिळते.
कसे खाल्ले तर फायदेशीर?
बदाम तुम्ही भिजवून खाऊ शकता, जे पचनासाठी उत्तम मानले जाते. शिवाय बदाम दुधासोबत, ग्रीक दह्यासोबत किंवा फळांसोबत स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता.
तर मग, आजपासून बदाम आहारात समाविष्ट करा!
आरोग्य राखण्यासाठी आणि फिटनेस टिकवण्यासाठी दररोज ५० ग्रॅम बदाम हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे मेंदू, हृदय आणि शरीरातील एकूणच आरोग्य बळकट राहते. पण लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ल्यासच फायदेशीर ठरते!
