AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिन्यातून किती वेळा बिअर प्यावी? नशा किती तास टिकते? 99 टक्के लोकांना माहिती नाही

Beer : अनेजकण दररोजण बिअरचे सेवन करतात तर काहीजण पार्ट्यांमध्ये वीकेंडला किंवा रिलॅक्स होण्यासाठी बिअर पितात. आज आपण एका दिवसात किती बिअर प्यावी? बिअरची नशी किती तास राहते याची माहिती जाणून घेणार आहोत.

महिन्यातून किती वेळा बिअर प्यावी? नशा किती तास टिकते? 99 टक्के लोकांना माहिती नाही
beerImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 30, 2025 | 9:25 PM
Share

भारतात बिअर पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेजकण दररोजण बिअरचे सेवन करतात तर काहीजण पार्ट्यांमध्ये वीकेंडला किंवा रिलॅक्स होण्यासाठी बिअर पितात. बिअर ही दारूपेक्षा थोडी सौम्य असते, म्हणजे यात अल्कोहोलचे प्रमाण खूप कमी असते. असं असलं तरी याचे मर्यादेपेक्षा जास्त सेवन करणे धोकादायक ठरू शकते. कारण बिअर पिल्याने आरोग्यावर आणि शरीरावरही परिणाम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात बिअर पिणे गरजेचे आहे. आज आपण एका दिवसात किती बिअर प्यावी? बिअरची नशा किती तास राहते अशी प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.

महिन्यातून किती वेळा बिअर प्यावी?

महिन्यातून किती वेळा बिअर प्यावी याचे काही ठरलेले प्रमाण नाही. जर तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही महिन्यातून 2-4 वेळा मर्यादित प्रमाणात बिअर पिऊ शकता. मात्र यासाठी काही नियमांचे पालन करावे. पुरुषांनी दिवसातून 650 मिली म्हणजे अंदाजे 2 ग्लास पेक्षा जास्त बिअर पिऊ नये. तर महिलांनी दिवसातून 330 मिली म्हणजे अंदाजे 1 ग्लासापेक्षा जास्त बिअर पिऊ नये. दररोज बिअर पिल्याने वजन वाढू शकते आणि झोपेवर परिणाम होऊ शकतो.

आरोग्यासाठी कोणती बिअर चांगली आहे?

तुम्ही तुरळक प्रमाणात बिअर पित असाल तर हलक्या आणि कमी कॅलरी असलेली बिअर पिणे फायदेशीर ठरेल. कारण त्यात अल्कोहोलचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे शरीराचे कमी प्रमाणात नुकसान होते. कोणत्या ऋतूत बिअर प्यावी? असाही अनेकांना प्रश्न पडतो. बिअर कोणत्याही ऋतूत पिता येते, मात्र उन्हाळ्यात थंड बिअर पिल्यास ताजेतवानेपणा येतो.

बिअरची नशा किती तास टिकते?

एका बिअर पिले की ती नशा 2 ते 4 तासांपर्यंत असते. मात्र आपण किती प्रमाणात बिअर पिलो? शरीराचे वजन किती आहे? बिअर रिकाम्या पोटी घेतली की अन्नासोबत? यावर बिअरची नशी किती तास टिकते हे अवलंबून आहे. महिलांनी गर्भधारणेदरम्यान किंवा स्तनपान करताना बअरचे सेवन करू नये. तसेच तुम्हाला यकृत, मूत्रपिंड किंवा हृदयरोग असेल तरीही बिअर पिऊ नये. रिकाम्या पोटी किंवा तुम्ही औषधे घेत असाल तरीही बिअरचे सेवन करू नये. तसेच वाहन किंवा एखादे यंत्र चालवण्यापूर्वी बिअरचे सेवन करू नये.

ब्लॅक बॉक्स खराब, तरी...समजू शकते अजितदादांच्या अपघाताचे कारण
ब्लॅक बॉक्स खराब, तरी...समजू शकते अजितदादांच्या अपघाताचे कारण.
नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांवर मोठे संकट! नेमकं काय झालं?
नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांवर मोठे संकट! नेमकं काय झालं?.
नंदनवन बंगल्यात राज ठाकरे-शिंदे भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
नंदनवन बंगल्यात राज ठाकरे-शिंदे भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण.
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: सीलबंद लिफाफा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: सीलबंद लिफाफा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे.
मुंबईकरांची कोंडी! पारा घसरला तरी खराब हवेची चिंता कायम
मुंबईकरांची कोंडी! पारा घसरला तरी खराब हवेची चिंता कायम.
किशोरी पेडणेकरांवर संतोष धुरींची टीका; अशा बांगेला विचारतंय कोण?
किशोरी पेडणेकरांवर संतोष धुरींची टीका; अशा बांगेला विचारतंय कोण?.
आजोबा मोठे, काका मोठे अन् मी..; ट्रोलर्सना रोहित पवारांचं सडेतोड उत्तर
आजोबा मोठे, काका मोठे अन् मी..; ट्रोलर्सना रोहित पवारांचं सडेतोड उत्तर.
सत्ता आणि ताकदीचा वापर करून तपास करा, रोहित पवारांची मागणी
सत्ता आणि ताकदीचा वापर करून तपास करा, रोहित पवारांची मागणी.
एजन्सीचं ते स्टेटमेंट हास्यास्पद! रोहित पवारांची टीका
एजन्सीचं ते स्टेटमेंट हास्यास्पद! रोहित पवारांची टीका.
रोहित पवार यांचे डीजीसीएच्या विमान अपघात चौकशीवर प्रश्नचिन्ह
रोहित पवार यांचे डीजीसीएच्या विमान अपघात चौकशीवर प्रश्नचिन्ह.