AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात मनुके खाताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा बिघडेल तुमचे आरोग्य

उन्हाळ्यात तुम्ही मनुके कोणत्या पद्धतीने खाता हे जास्त महत्त्वाचे असते. कारण कच्चे मनुके शरीराचे तापमान वाढवण्यासोबतच पोटही उबदार करू शकतात. उन्हाळ्यात जेव्हाही तुम्ही मनुके खाता तेव्हा या प्रकारे त्यांचे सेवन करा. कारण हे तुमच्या एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

उन्हाळ्यात मनुके खाताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा बिघडेल तुमचे आरोग्य
मनुके खाताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात,
| Edited By: | Updated on: Apr 24, 2025 | 3:18 PM
Share

उन्हाळा सुरू झाला आहे. या दिवसांमध्ये आपण आपल्या आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष देत असतो. जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. कारण या ऋतूमध्ये आजारी पडण्याचा धोका जास्त असतो. जर तुम्ही उन्हाळ्यात सुकामेवा खात असाल तर काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आज, या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला या ऋतूत सुकामेवा खाताना त्यात असलेले मनुके कसे खावे याबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात…

मनुका आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. बाजारात अनेक प्रकारचे मनुके उपलब्ध आहेत. उन्हाळ्यात तुम्ही अनेकदा भिजवलेले मनुके खावेत जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. खरंतर, मनुके हे खूप उष्ण असतात, म्हणून जर तुम्ही ते कच्चे खाल्ले तर तुमच्या शरीराचे तापमान वाढू शकते. उन्हाळ्यात मनुके खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घ्या.

दिवसातून किती मनुके खावेत?

मनुक्यांमध्ये भरपूर लोह, फायबर आणि पोटॅशियम असते. ते खाल्ल्याने तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनही वाढते. मनुका पुरुषांच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहेत. अशातच आयुर्वेद तज्ज्ञ यांनी सांगितले की, मुले असोत किंवा प्रौढ, उन्हाळ्यात प्रत्येकांने मोजून 10 मनुके खावे. पण लक्षात ठेवा की ते भिजवणे आवश्यक आहे. जर तुम्ही यापेक्षा जास्त खाल्ले तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.

मनुकाचे पाणी

उन्हाळ्यात जेव्हाही तुम्ही मनुके खाल तेव्हा ते कच्चे खाऊ नका त्याऐवजी ते पाण्यात भिजवून खा. यासाठी, मनुके रात्रभर स्वच्छ पाण्यात भिजवा आणि नंतर सकाळी उठल्यावर भिजवलेल्या मनुक्यांचे सेवन करा त्यासोबतच मनुक्यांचे पाणी पाणी देखील प्या. मनुकाचे पाणी तुमच्या पोटासाठी आणि पचनासाठी खूप फायदेशीर आहे.

मनुकाचे पाणी पिताना वेळ आणि प्रमाण लक्षात ठेवा

सकाळी रिकाम्या पोटी मनुकाचे पाणी पिणे चांगले. हे एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात जास्त ड्रायफ्रुट्स खाऊ नयेत.

वजनावर नियंत्रण

भिजवलेल्या मनुक्यात भरपूर फायबर असते, ज्यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. अनहेल्दी स्नॅक्सचे सेवन करण्याऐवजी तुम्ही मनुके खाऊ शकता. उन्हाळ्यात भिजवलेले मनुके खाल्ल्यास तुमचे शरीर पूर्णपणे हायड्रेटेड राहते. मनुकामध्ये व्हिटॅमिन सी आणि बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे खूप महत्त्वाची असतात. त्यात फिनोलिक रसायने असतात जे अँटीऑक्सिडंट्सयुक्त असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. मजबूत प्रतिकारशक्ती अनेक आजारांशी लढण्यास मदत करते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.