AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पांढऱ्या पेशी कमी झाल्यात; झटपट वाढवण्यासाठी हे पान ठरेल तुमच्यासाठी संजीवनी

पावसाळ्यात पसरणाऱ्या आजारांमुळे प्लेटलेट्सची कमतरता होऊ शकते. ही पाने प्लेटलेट्स वाढवण्यासाठी एक प्रभावी नैसर्गिक उपाय आहेत. त्यात असलेले कार्पेन, व्हिटॅमिन सी आणि एन्झाईम्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि पेशींची निर्मिती वाढवतात.

पांढऱ्या पेशी कमी झाल्यात; झटपट वाढवण्यासाठी हे पान ठरेल तुमच्यासाठी संजीवनी
white blood count 1
| Updated on: Sep 19, 2025 | 11:31 AM
Share

अनेकदा पावसाळा आला की विविध आजार पसरतात. काही वेळेला मलेरिया, डेंग्यू, यांसारखे आजार झाले की आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या झपाट्याने कमी होत जाते. यामुळे तुम्हाला कमजोर झाल्यासारखे वाटते. जेव्हा शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होते, तेव्हा काहीजण डॉक्टरकडे जाण्याआधी घरगुती उपाय करतात. यातील सर्वात लोकप्रिय उपाय म्हणून पपईच्या पानांकडे पाहिले जाते. पण पपईच्या पानात असं काय असते, जेणेकरुन तुमच्या पांढऱ्या पेशी सहज वाढतात.

आयुर्वेदिक तज्ज्ञ आणि आधुनिक विज्ञान या दोन्हीमध्ये पपईच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. पपईच्या पानांमध्ये अनेक जादुई घटक असतात. यात कार्पेन (Carpein) नावाचे एक शक्तिशाली अल्कलॉइड असते. हा घटक आपल्या रक्ताच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवतो. याशिवाय यात व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A, फ्लेवोनॉइड्स आणि पपाइनसारखी एन्झाईम्स भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व घटक एकत्रितपणे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. तसेच शरीरातील पेशींच्या निर्मितीला गती देतात.

पपईच्या पानांचा रस कसा बनवायचा?

हा रस बनवणे खूप सोपे आहे. यासाठी फक्त ३-४ ताजी, हिरवी पपईची पाने घ्या. ती स्वच्छ धुऊन घ्या. मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून ती वाटून घ्या. यानंतर रस गाळून घ्या आणि लगेच प्या. तुम्हाला पिताना हा रस थोडा कडू लागेल. पण यामुळे तुम्हाला तात्काळ फरक पडेल.

पपईच्या पानांचा रस कोणी पिऊ नये?

  • गरोदर स्त्रियांनी आणि लहान मुलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा उपाय करू नये.
  • हा उपाय प्लेटलेट्स कमी होण्याच्या गंभीर समस्येवर पूर्ण उपचार नाही. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी उपयुक्त?

  • प्लेटलेट्स वाढवण्यासाठी फक्त पपईच्या पानांवर अवलंबून राहू नका. तुमची जीवनशैली आणि आहार यात मोठे बदल घडवू शकतात.
  • डाळिंब, बीट, किवी आणि संत्री यांसारखी फळे आणि भोपळ्याच्या बिया, हिरव्या पालेभाज्या यांचा तुमच्या आहारात समावेश करा.
  • शरीरातील रक्ताचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
  • जंक फूड, मसालेदार आणि तेलकट पदार्थ टाळा.

प्लेटलेट्स कमी होणे ही एक गंभीर समस्या आहे, पण ती योग्य काळजी घेतल्यास नक्कीच दूर होऊ शकते. पपईच्या पानांचा उपाय एक चांगला नैसर्गिक पूरक उपाय म्हणून वापरला जाऊ शकतो, पण मुख्य उपचार नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

Follow Us
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला....
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला.....
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन.
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात...
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात....
सुप्रिया सुळेंनी अचानक घेतली सोनिया गांधींची भेट, दिल्लीत नेमकं काय...
सुप्रिया सुळेंनी अचानक घेतली सोनिया गांधींची भेट, दिल्लीत नेमकं काय....
विधानपरिषद निवडणूक : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला काय? मंत्री...
विधानपरिषद निवडणूक : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला काय? मंत्री....
NEET पेपरफुटी प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं मोठं कांड समोर, थेट NTA...
NEET पेपरफुटी प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं मोठं कांड समोर, थेट NTA....
मुख्यमंत्र्यांच्या मुंबईते शिर्डी प्रवासादरम्यानच्या त्या कृत्याने...
मुख्यमंत्र्यांच्या मुंबईते शिर्डी प्रवासादरम्यानच्या त्या कृत्याने....
धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्... नाशिकच्या..
धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्... नाशिकच्या...
मोठी खळबळ! घराचा नकाशा, संवेदनशील माहिती अन्... थेट डॉनाल्ड ट्रम्प...
मोठी खळबळ! घराचा नकाशा, संवेदनशील माहिती अन्... थेट डॉनाल्ड ट्रम्प....