AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cockroache in Kitchen : डोकं तुटल्यावरही झुरळ किती दिवस जिवंत राहू शकतं? झुरळाचं आयुष्य किती असतं?

Cockroache in Kitchen : आता उन्हाळा सुरु होतोय आणि तुम्हाला किचन, बाथरुममध्ये झुरळी नजरेस पडतील. या झुरळांचा जन्म कसा होतो? नर झुरळ-मादी झुरळं कसं ओळखायचं? मादी झुरळं एकावेळी किती अंडी घालते? झुरळाची पिल्लं किती दिवसानी बाहेर येतात? या बद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्या.

Cockroache in Kitchen : डोकं तुटल्यावरही झुरळ किती दिवस जिवंत राहू शकतं? झुरळाचं आयुष्य किती असतं?
Cockroache
| Updated on: Mar 30, 2026 | 10:33 PM
Share

उन्हाळा सुरु झालाय. गरमी जशी वाढेल तसं किचन आणि बाथरुममध्ये झुरळाची फौज जमा होऊ लागेल. या झुरळांना घरातून पळवून लावणं कठिण असतं. एकाला मारलं की दुसरी कुठून तरी निघतोच. या झुरळांमुळे फक्त घाणच होत नाही तर आजारही फैलावतात. या झुरळांबद्दल काही रोचक गोष्टी जाणून घ्या. एका झुरळाचं आयुष्य किती असतं हे तुम्हाला माहित आहे का?. एकाचवेळी झुरळ किती अंडी देतो?. झुरळ एकाचवेळी 10 ते 18 अंडी देतो. झुरळाची पिल्लं 28 ते 60 दिवसात अंड्यातून बाहेर येतात. नर झुरळ ओळखायचं असेल तर त्याचे पंख शरीरापेक्षा लांब असतात. मादी झुरळाचे पंख छोटे असतात किंवा त्या पंखहीन असतात.

झुरळाचं वय सामान्यत: 6 महिने ते 1 वर्ष असतं. प्रजाती आणि परिस्थितीनुसार झुरळं दोन वर्षापर्यंतही जिवंत राहू शकतात. मादी झुरळं नर झुरळांपेक्षा जास्त जगतात असं बोलतात. लवंगीचा वास झुरळांचा अजिबात आवडत नाही. त्यापासून ते लांब पळतात. तुम्ही 10 लवंगी कुटून घ्या. ते कूडलिंबाच्या तेलात मिसळा. हे झुरळं जिथून जास्त येतात किचनमध्ये त्या ठिकाणी ठेवा. त्याशिवाय बेकिंग सोड्याचा वापर करुनही तुम्ही झुरळांना पळवू शकतात. दोन चमचा बेकिंग सोड्यात साखर मिसळा आणि एक कप पाण्यात टाका. स्प्रे बॉटलमध्ये हे मिश्रण मिसळून जिथून जास्त झुरळं येतात, तिथे फवारणी करा.

पाण्याविना झुरळ किती दिवस जिवंत राहतं?

झुरळ काहीही न खाता एक महिना जिवंत राहू शकते, तर पाण्याविना एक आठवडा जिवंत राहू शकते. जेव्हा झुरळाचं डोकं तुटतं तेव्हा ते झुरळ जवळपास एक आठवडा जिवंत राहू शकतं. पण डोके तुटल्यावर तोंड नसल्याने त्याला पाणी पिता येत नाही आणि ते एक आठवड्यानंतर मरते. एक झुरळ साधारणपणे एक वर्षे जगते आणि या काळात अनेक झुरळ जन्माला घालते.

डोकं तुटल्यावरही झुरळ कसं जिवंत राहतं?

त्याशिवाय अजूनही झुरळाबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. झुरळ काहीही न खाता कमीत कमी एक महिला जिवंत राहू शकतं. पाण्याशिवाय ते एक आठवडा जिवंत राहतं. डोकं तुटल्यानंतरही ते एक आठवडा जिवंत राहू शकतं. डोकं तुटल्यावर तोंड नसल्याने ते पाणी पिऊ शकत नाही. झुरळाच्या शरीरात अनेक ठिकाणी छोटी- छोटी छिद्र असतात. त्याला स्पायरकेल्स म्हणतात. त्याच भागातून झुरळांचा श्वासोश्वात चालतो. शरीराच्या विविध भागात ही छिद्र असल्याने गॅस एक्सचेंज होतो. त्यामुळे डोकं जरी तुटलं तरी झुरळ आठवडाभर जिवंत राहू शकते. पण पाण्याशिवाय एक आठवड्यापुढे ते जिवंत राहू शकतं नाही.

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय