AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पचनक्रियेला फायदेशीर असणारी नारळाच्या मलाईची खीर! कशी बनवणार? वाचा

ही क्रीमी खीर तुम्ही पटकन बनवून खाऊ शकता. तसेच चवीला ही खूप चविष्ट असते. याचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया चांगली होते. तसेच तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटते, तर चला जाणून घेऊया नारळाची मलाई खीर कशी बनवावी...

पचनक्रियेला फायदेशीर असणारी नारळाच्या मलाईची खीर! कशी बनवणार? वाचा
Coconut malai kheerImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 07, 2023 | 7:48 PM
Share

मुंबई: नारळ क्रीम मध्ये फायबर आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे याचे सेवन केल्याने तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्सही कमी प्रमाणात असतात, ज्यामुळे तुमचे वजन वाढत नाही. सामान्यत: लोक नारळाच्या पाण्याचे सेवन करतात. पण क्रीम अनेकदा सोडून जातात. अशावेळी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही क्रीम खीर देखील खाऊ शकता. तर आज आम्ही तुमच्यासाठी नारळ मलाई खीर बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. ही क्रीमी खीर तुम्ही पटकन बनवून खाऊ शकता. तसेच चवीला ही खूप चविष्ट असते. याचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया चांगली होते. तसेच तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटते, तर चला जाणून घेऊया नारळाची मलाई खीर कशी बनवावी…

नारळाची क्रीम खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • तूप १ टेबलस्पून
  • दूध किंवा नारळाचे दूध २ कप
  • साखर १/४ कप
  • काजू २ टेबलस्पून
  • बदाम २ टेबलस्पून मनुका २ टेबलस्पून
  • वेलची पावडर १/४ टीस्पून
  • नारळ क्रीम १/२ कप
  • नारळ पाणी १/२ कप

नारळाच्या मलाईची खीर कशी बनवावी?

  • नारळाच्या क्रीमची खीर बनवण्यासाठी प्रथम एका कढईत तूप घालून मध्यम आचेवर ठेवावे.
  • नंतर त्यात बदाम आणि काजू घालून गोल्डन होईपर्यंत परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात मनुका घालून सुमारे १५ ते ३० सेकंद परतून घ्या.
  • मग ते सगळं परतून घेतलेलं एका प्लेटमध्ये बाहेर काढून बाजूला ठेवा.
  • यानंतर त्याच कढईत दूध टाकून उकळायला ठेवावे.
  • नंतर दूध उकळून अर्धे होईपर्यंत गरम करा
  • त्यानंतर त्यात साखर आणि वेलची पूड घालून मिक्स करावे.
  • नंतर गॅस बंद करा आणि मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या.
  • यानंतर थंड खीरमध्ये नारळाचे क्रीम, नारळ पाणी आणि भाजलेले शेंगदाणे घाला.
  • मग या सर्व गोष्टी मिसळून खीर थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
  • आता तुमची चवदार नारळाची मलाई खीर तयार आहे.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच