AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kitchen Tips : कितीही छान पीठ मळलं तरी पुरी फुगत नाही? त्यासाठी या सोप्या 5 टिप्स करा फॉलो

पुरीचं पीठ पोळीच्या पीठापेक्षा थोडं घट्ट असणं महत्त्वाचं आहे; पाणी हळूहळू घालून पीठ मळा. शेवटी थोडं तेल घालून पीठ पुन्हा मळल्यास ते गुळगुळीत होण्यास मदत होते.

Kitchen Tips : कितीही छान पीठ मळलं तरी पुरी फुगत नाही? त्यासाठी या सोप्या 5 टिप्स करा फॉलो
crispy pooriImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 8:31 PM
Share

पुरी तेलात पडली की फुगण्याऐवजी चपटीच राहिली तर सगळा मूडच खराब होतो! कितीही छान पीठ मळलं तरी पुरी फुगत नसेल तर नेमकी चुक कुठे होते ? पुरी फुगून मस्त गोल आणि खुसखुशीत होण्यासाठी पीठ मळतानाच काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

पुरीचं पीठ पातळ होऊ देऊ नका

पुरीसाठी मळलेलं पीठ पोळीच्या पीठापेक्षा थोड घट्ट असावं. पीठ मळताना एकदम जास्त पाणी घालू नका. गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून पीठ मळा. पीठ व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यात एक चमचा तेल घालून पुन्हा एक- दोन मिनिटे मळा.यामुळे पीठ मऊसर आणि गुळगुळीत होईल.

पीठ जास्त वेळ झाकून ठेवू नका

पुरीच्या पीठाला जास्त वेळ झाकून ठेवण्याची गरज नसते.पीठ मळल्यानंतर साधारण ५ ते १० मिनिटे ते झाकून ठेवलं तरी पुरेसं आहे. खूप वेळ पीठ तसंच ठेवल्यास पुरीच्या पीठावर परिणाम होतो.

कुरकुरीत पुरीसाठी रवा वापरा

पुरी थोडी जास्त कुरकुरीत हवी असेल तर पीठात थोडावा रवा मिसळू शकता. यामुळे पुरीला कुरकुरीतपणा येतो आणि टम्म फुगतेही.

पुरी लाटताना ही चूक टाळा

पुरी खूप पातळ किंवा खूप जाड लाटू नये. योग्य जाडी ठेवणं महत्त्वाचं आहे. पुरी लाटताना पोळीप्रमाणे कोरडं पीठ लावणं टाळा . कोरड्या पिठाचे कण तेलात पडल्याने तेल खराब होते. त्यामुळे पुरी नीट फुगत नाही. त्यामुळे पुरीला पीठ लावण्याऐवजी नेहमी थोड्याप्रमाणात तेल लावून लाटावे.

तेलं पुरेसं गरम असणे गरजेचे

पुरी फुगण्यासाठी तेलाचं तापमान योग्य असणं खूप महत्त्वाचे आहे. तेल कमी गरम असेल तर पुरी जास्त तेल शोषू शकते. तेल खूप गरम असेल तर पुरी बाहेरून पटकन लाल होऊ शकते आणि आतून नीट शिजणार नाही. तेल तपासण्यासाठी पीठाचा छोटा तुकडा तेलात टाकून पाहा. तो लगेच वर आला आणि तेलात तरंगू लागला तर समजून जा तेल पुर्णपणे गरम झालेले आहे.

पुरी तेलाच टाकल्यानंतर हलकं दाबा

लाटलेली पुरी काळजीपूर्वक तेलात सोडा. पुरी तळायला सुरूवात झाल्यावर झाऱ्याने हलकं तेल तिच्यावर टाकत किंवा पुरीला हलकं दाबत राहिल्यास ती फुगण्यास मदत होते. पुरी फुगल्यानंतर ती पलटून दुसरी बाजूही तळा. पुरी साधारण सोनेरी रंगाची झाली की बाहेर काढा.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा