AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Story | निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार ‘सांधण व्हॅली’, एकदा तरी सफर केलीच पाहिजे!

निसर्गाच्या कुशीत दडलेलं ‘सांधण व्हॅली’ अर्थात ‘सांधण दरी’  हे आश्चर्य आजही आपल्यापैकी अनेकांच्या नजेरेपासून दूर आहे.

Special Story | निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार ‘सांधण व्हॅली’, एकदा तरी सफर केलीच पाहिजे!
सांधण व्हॅली
| Updated on: Feb 07, 2021 | 12:42 AM
Share

मुंबई : महाराष्ट्राला लाभलेला निसर्गाचा वरदहस्त म्हणजे ‘सह्याद्री’. सुट्टी मिळाली आणि फिरण्याचा विषय निघाला की, पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे ‘सह्याद्री’. सह्याद्रीच्या कुशीत लपलेली अनेक ठिकाणे नेहमीच पर्यटकांना भूरळ घालत असतात. याच निसर्गाच्या कुशीत दडलेलं ‘सांधण व्हॅली’ अर्थात ‘सांधण दरी’  हे आश्चर्य आजही आपल्यापैकी अनेकांच्या नजेरेपासून दूर आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या साम्रद या गावातून पुढे दीड ते दोन किमी नागमोडी वळणे घेत जाणारी ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते (How to reach Sandhan Valley trek near ahmadnagar).

पावसाळ्याचे चार महिने वगळता वर्षभर पर्यटक इथे गर्दी करतात. सांधण दरीतल्या निमुळत्या वाटेवरून पुढे जात रात्री तिथेच मुक्काम करायचा हाच इथे आलेल्या अनेकांचा प्लॅन असतो. ही चिंचोळी वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की, कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहचत नाही. समोर आजोबा पर्वत, रतन गड आणि मागे अलंग-मदन-कुलंग गड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांधण दरी सर करणे आपल्याला वाटते तितके सोपे नाही.

सर्वात खोल दरी

आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये ‘सांधण व्हॅली’चा दुसरा क्रमांक लागतो. म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 किमी लांबवर पसरलेली आहे.

कधी भेट द्याल?

पावसळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते. कारण पावसाचे पाणी याच दरीतुन वेगाने खाली कोसळते. त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा किंवा हिवाळा. दुपारच्या प्रहरात दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो. दरीत गेल्यावर मार्गक्रमण करताना पाण्याचे दोन पुल लागतात. पहिला पुल 2 ते 4 फुट आणि दुसरा पुल 4 ते 6 फुट पाण्यात असतो. हिवाळ्यात या पाण्याची पातळी थोडी अधिक असू शकते (How to reach Sandhan Valley trek near ahmadnagar).

कसे पोहोचाल?

‘सांधण व्हॅली’ला पोहचण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या काठाने साम्रद या गावी जावे लागते. पुण्यावरुन पोहचण्यासाठी आळेफाटा-संगमनेर-अकोले-राजूर-शेंडी(भंडारदरा)-उडदावणे-साम्रद असा रस्ता आहे. मुंबईकरांसाठी कल्याण-कसारा घाट-इगतपुरी-घोटी मार्गे शेंडीला पोहचता येते. तर नाशिकहूनही घोटीमार्गे येथे पोहचता येईल.

काय-काय बघाल?

घळीच्या मुखाजवळच उजव्या हाताला पाणवठा आहे. नैसर्गिकपणे डोंगरातून झिरपणारे थंडगार नितळ पाणी म्हणजे जणू अमृतच! माणसे आणि जनावरांसाठी दगड रचून वेगळी सोय केलेली दिसते. अतिशय अरुंद घळ, कधी आठ-दहा फूट तर कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल एवढी तीन फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंना अंगावर येणारा दगडी कमीतकमी दोनशे आणि जास्तीत जास्त चारशे फूट उंचीचा पाषाणकडा आहे. त्याच घळीतून खाली उतरत दरीच्या अगदी शेवटच्या मुखाशी जाता येते.

अंदाजे या निमुळत्या घळीची लांबी एक किलोमीटर आहे. त्यानंतर समोर विराट कोकणकड्याचा भाग दिसतो. एकदम हजार-दीडहजार फुटांचा ड्रॉप आणि समोर करुळ घाटाचा कडा आहे. सांधण घळीत पावसाळ्यात काही ठिकाणी बरेच पाणी भरते. त्यामुळे त्या जागा थोड्या जपूनच किंबहुना दोराच्या आधारानेच पार कराव्यात. तुम्हीही येत्या सुट्टीत ‘सांधण व्हॅली’ला भेट देण्याची योजना आखत असाल, तर मुक्कामाची आणि जेवणाची सोय जवळच्या साम्रद गावात होऊ शकते. मग वाट कसली बघताय? बॅग भरा आणि चला सांधण दरीच्या सफरीला…

(How to reach Sandhan Valley trek near Ahmednagar)

हेही वाचा :

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.