AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lifestyle News : वीजबिल पाहून बत्ती गुल होते? या टिप्स करा फॉलो, बिल होईल कमी

घरातील उपकरणांचा वापर करण्याची पद्धत बदलूनही विजेचा अनावश्यक वापर कमी करता येतो. फ्रिजची योग्य सेटिंग, देखभाल आणि इन्व्हर्टरची तपासणी यामुळे वीजबिलावर परिणाम होऊ शकतो.

Lifestyle News :  वीजबिल पाहून बत्ती गुल होते? या टिप्स करा फॉलो, बिल होईल कमी
electric bill Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 7:13 PM
Share

महिन्याच्या सुरूवातीला घरात येणारं वीजबील पाहून आपली बत्ती गुल होण्याची वेळ येते. मग सुरू होते बाबांची वीज बचाव मोहिम, हे बंद करा, ते बंद करा,उगाच लावून ठेवता. पण आता त्यांना कोण सांगणार याशिवाय देखील शक्कल लढवून वीजबील कमी करता येतं. कसं ? ते जाणून घ्या. घरातील काही उपकरणांचा वापर करण्याची पद्धत बदलूनही विजेची बचत करता येते. फ्रिजची योग्य सेटिंग, इन्व्हर्टरची देखभाल आणि छोट्या सवयी यामुळे वीजेचा अनावश्यक वापर कमी होण्यास मदत कमी होऊ शकते.

फ्रिजची कूलिंग सेटिंग योग्य ठेवा

फ्रिज कायम सुरू असल्याने त्याच्या कूलिंग सेटिंगकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. अनेकजण फ्रिजच तापमान कायम कुलिंगवर ठेवतात. मात्र गरजेपेक्षा जास्त थंडावा ठेवल्याने वीजेवर ताण येतो. त्यामुळे फ्रिजच्या सूचना पुस्तिकानुसार योग्य तापमान ठेवा. फ्रिजमध्ये गरजेपेक्षा जास्त सामान कोंबून ठेवू नका. आत थंडावा राहण्यासाठी थोडी जागा असणं आवश्यक आहे.

फ्रिज भिंतीला चिटकवून ठेवू नका

फ्रिज अगदी भिंतीला लागून ठेवल्यास त्याच्या मागील बाजूला हवा खेळती राहण्यास अडथळा येऊ शकतो. त्यामुळे फ्रिजच्या रचनेनुसार भिंतीपासून योग्य अंतरावर ठेवा. मागील बाजूच्या कॉईलवर धूळ साचली असल्यास ती स्वच्छ करा. कारण कॉईवर धूळ साचल्यास फ्रिजला थंडावा राखण्यासाठी अधिक वीज वापरावी लागते त्यामुळे वीजबील वाढू शकते.

फ्रिजचं दार वारंवार उघडणं टाळा

फ्रिजमधून एखादी वस्तू काढताना किंवा बाहेर ठेवताना दार जास्त वेळ उघडं ठेवू नका. प्रत्येक वेळी दार उघडल्यानंतर बाहेरची हवा आत जाते. मग पुन्हा फ्रिजचं तापमान थंड राखण्यासाठी फ्रिजला अधिक वीज वापरावी लागते.

गरमा गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवणे टाळा

गरमा गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवल्याने अधिक वीज खर्च होते. गरम अन्नाला थंड करण्यासाठी फ्रिज अधिक वीज खेचून घेतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा. गरम अन्न साधारण थंड झाल्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवावे.

इन्वर्टरच्या बॅटरीची वेळोवेळी तपासणी करा

घरातील इन्वर्टर आणि त्याच्या बॅटरीची योग्य देखभाल करणंही महत्त्वाचं आहे. बॅटरी जुनी झाली असेल किंवा तिच्यात काही बिघाड असेल तर चार्जिंगवर परिणाम होऊ शकतो. त्यामळे बॅटरीची स्थिती वेळोवेळी तपासा.

इन्वर्टर पूर्ण चार्ज झाल्यानंतर ऑटो कट तपासा

इन्वर्टरची बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर चार्जिंग थांबत आहे का हे तपासणं गरजेचं आहे. ऑटो- कटची सुविधा असल्यास ती व्यवस्थित काम करते आहे का याची खात्री करा.

Follow Us
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना...
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना संभाजी पाटील निलंगेकरांचे जोरदार प्रत्युत्तर
अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
संजय राऊतांचा खळबळजनक दावा! अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी...
Vilas Londhe : टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी स्पष्ट केली भूमिका
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर...
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर सांगितलं रंजक गुपित
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा...
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद...
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद, प्रदूषणातही वाढ
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो.
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो धावपटूंचा प्रतिसाद
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच...
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच लागली डुलकी; VIDEO व्हायरल!