AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yellow Stain On Plastic Tiffine : हळदीचे डाग अन् तेलाचा वास! प्लास्टिकच्या डब्ब्यावरील पिवळे डाग काढण्यासाठी करा फक्त हे 4 उपाय

टोमॅटोची ग्रेव्ही, हळद किंवा मसालेदार पदार्थ ठेवल्यामुळे प्लास्टिकच्या डब्यांवर हट्टी पिवळे डाग पडतात. कितीही साबणाने धुतलं तरी हे डाग सहज जात नसतील तर हे घरगुती उपाय करून पाहा.

Yellow Stain On Plastic Tiffine : हळदीचे डाग अन् तेलाचा वास! प्लास्टिकच्या डब्ब्यावरील पिवळे डाग काढण्यासाठी करा फक्त हे 4 उपाय
yellow stain on plasticImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 04, 2026 | 5:48 PM
Share

किचनमधले प्लास्टिकचे डब्बे रोजच्या वापरात खूप कमी येतात, पण त्यात टोमॅटोची ग्रेव्ही, हळद, मसालेदार भाजी, चहा किंवा कॉफी ठेवल्यानंतर डब्याच्या आत पिवळे किंवा गडद डाग पडतात. कितीही साबणाने धुतलं तरी हे डाग सहज निघत नाही. मग त्या डब्यांना त्या तेलाचा वासही मारू लागतो. अशावेळी ते डब्बे फेकून देण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. पण काही टिप्स वापरून हे डाग कमी करता येतात.

बेकिंग सोड्याची पेस्ट करून पाहा

प्लास्टिकच्या डब्ब्यावर जिथे डाग पडलेत, तिथे थोडा बेकिंग सोडा घ्या. त्यात थोडं कोमट पाणी घालूव घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागावर लावून मऊ स्पंजने हलक्या हाताने घासा. जास्त हट्टी डाग असेल तर पेस्ट 15 ते 30 मिनिटे तशीच ठेवून नंतर डिश सोप आणि पाण्याने डब्बा धुवा

लिंबाच्या रसाचा वापर

डब्ब्यावरील पिवळ्या डागावर लिंबाचा रस लावून काही वेळ ठेवता येतो. त्यानंतर डबा पाण्याने स्वच्छ धुवा. धुतल्यानंतर थोडा वेळ स्वच्छ डबा उन्हात ठेवसा तरी डाग हलका होण्यास मदत होते. जास्त वेळ उन्हात न ठेवता प्लास्टिकचा डबा थोडाच वेळ उन्हात ठेवावा.

व्हिनेगरचा वापर

डाग असलेल्या डब्ब्यांना पांढरे व्हिनेगर लावणे हा पर्याय सर्वात उत्तम आहे. डब्ब्यात थोडा व्हिनेगर आणि कोमट पाणी घेऊन साधारण ३० मिनिटांनी धुवावा यामुळे वासही जाईल आणि डब्ब्यांचा पिवळेपणाही गायब होईल.

पुढे डाग पडू नयेत म्हणून ही सवय लावा

टोमॅटो, हळद किंवा जास्त मसालेदार पदार्थ प्लास्टिकच्या डब्ब्यात ठेवल्यानंतर ते खूप वेळ ठेवू नका.वापर झाल्यानंतर लवकराच लवकर डाग स्वच्छ धुवा. भरपूर डाग पडले असतील तर तो डबा बदला.

अशा प्रकारे डाग पडल्यावर लगेच प्लास्टिकचा डबा फेकून देण्याऐवजी आधी हे सोपे होम टिप्स करून पाहा. पण जर प्लास्टिक खराब झाले असेल किंवा त्याला भेगा पडल्या असतील तर फक्त डाब काढत बसू नका. डबा वेळोवेळी बदला.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात