Hair Care : हिवाळ्यात केसांचा गुंता होतोय, केस राठ होतात?; मग या टिप्स तुमच्यासाठीच

हिवाळ्यात केस प्रचंड खराब होतात. सतत धुतल्यामुळे देखील होतं केसांचं मोठं नुकसान... केसांना तेल लावत असाल तर घ्या महत्त्वाची काळजी... हिवाळ्यात स्किन आणि केसांची काळाजी घेण्यासाठी नक्की काय कराल? आज जाणून घेवून हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल...

Hair Care : हिवाळ्यात केसांचा गुंता होतोय, केस राठ होतात?; मग या टिप्स तुमच्यासाठीच
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 2:42 PM

मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : हिवाळा आला का थंडी वाढते. वातावरणात अनेक बदल होतात आणि वातावरणात होणाऱ्या बदलाचा परिणाम आपल्या स्किन आणि केसांवर होतो. केसांमध्ये होणारा गुंता वाढतो, केस राठ होतात… अशा अनेक समस्या हिवाळ्यात जाणवतात. ज्यामुळे केस प्रचंड खराब होतात. एवढंच नाही तर, वाढत्या प्रदुषणाचा देखील केस आणि स्किनवर परिणाम होतो. केसात कोंडा देखील होतो. म्हणून हिवाळ्यामध्ये केसांची आणि स्किनची काळजी घेणं मोठं कठीण असते. अनेक महिलांना जाणवतो हिवाळ्यात त्रास…

केसांमुळे सौंदर्य वाढतं. केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी महिला हीट स्टाइलिंग साधनांचा वापर करतात. ज्याचा वाईट परिणाम केसांवर होतो. ड्रायर, फ्लॅट आयर्न आणि कर्लिंग आयरन यांसारखी हीट स्टाइलिंग टूल्स आपल्या केसांना खूप नुकसान पोहोचवतात. तर आज जाणून घेवून हिवाळ्यात स्किन आणि केसांची काळजी कशी घ्याल…

शॅम्पू आणि कंडीशनर : सल्फेट आणि पॅराबेन फ्री शॅम्पू वापरावा. तसेच शॅम्पू वापरताना काळजी घ्य. केस धुतल्यानंतर कंडिशनर नक्की लावा. कंडिशनरमुळे तुमचे केस हायड्रेटेड राहतील. केस धुतल्यानंतर फक्त पाच मिनिटं कंडिशनर लावा. कंडिशनर केसांना मॉइश्चरायझ करतं. ज्यामुळे केसांची काळजी घेण्यास मदत होते.

जास्त गरम पाणी टाळा : गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील आणि केसांमधील ओलावा दूर होतो. ज्यामुळे केस आणि स्किन दोन्ही कोरडे होतात. म्हणून जास्त गरम पाण्यात अंघोळ करु नका. कोमट पाण्यात अंघोळ केल्यास केस आणि स्किनचं सौंदर्य वाढतं.

केसांना तेल लावू नका : केसांना तेल लावणं चांगलं आहे. पण केस धुवण्यापूर्वी फक्त १ किंवा २ तास आधी तेल लावल्यामुळे केस चांगले राहतात. रात्री तेल लावणे आणि सकाळी धुवणे… ही सवय चांगली नाही. असं केल्यास केस कमजोर होतात आणि तुटू लागतात.

रोज केस धुवू नका : हिवाळ्यात रोज केस धुवणं टाळा. रोज केस धुतल्यमुळे केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाऊ शकतं. ज्यामुळे तुमचे केस कोरडे, राठ आणि कुरळे होतात. एवढंच नाही तर केसांमधील गुंता देखील वाढतो. म्हणून हिवळ्यात आठवड्यातून दोनवेळा केसं धुवावेत.

Non Stop LIVE Update
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं.
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?.
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य.
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं.
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?.
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?.
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?.
१५ दिवसांची मुदत अन्यथा नागपुरात..., तुपकर यांचा निर्वाणीची इशारा का?
१५ दिवसांची मुदत अन्यथा नागपुरात..., तुपकर यांचा निर्वाणीची इशारा का?.
शिंदे यांना शिवीगाळ अन् दत्ता दळवी यांना अटक, राऊत यांनाही होणार अटक?
शिंदे यांना शिवीगाळ अन् दत्ता दळवी यांना अटक, राऊत यांनाही होणार अटक?.