AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stress Buster | ताणतणावापासून दूर राहण्यासाठी रकुल प्रीत घेते योगाचा आधार, तुम्ही ट्राय करून शकता ‘ही’ योगासनं!

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री रकुल प्रीत सिंह तिच्या फिटनेससाठी ओळखली जातो. कितीही व्यस्त शेड्युल असले तरी ती आपल्या व्यायामाला प्रथम प्राधान्य देते.

Stress Buster | ताणतणावापासून दूर राहण्यासाठी रकुल प्रीत घेते योगाचा आधार, तुम्ही ट्राय करून शकता ‘ही' योगासनं!
अभिनेत्री रकुल प्रीत सिंह
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Feb 17, 2021 | 4:08 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) नुकतीच तिच्या योगा सेशन दरम्यान स्पॉट झाली आहे. ती बर्‍याचदा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फिटनेस व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. अलीकडे रकुलने असाच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती योगा करताना दिसत आहे. या फोटोत रकुल आपली बॉडी स्ट्रेचिंग करताना आणि शरीराचे संतुलन साधताना दिसत आहे (How yoga become stress buster for rakul preet singh).

हा फोटो शेअर करताना रकुलने लिहिले की, ‘शरीर स्टिफ नाही, तर मन आहे.’ योगा केल्यास मन शांत होते. तसेच यामुळे आपला मानसिक ताणही दूर होतो. योगासने केल्याने आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहता. हा फोटो शेअर करताना रकुल प्रीतने तिच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक पोस्टने केली आहे. ती अनेकदा लोकांना तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरित करत असते.

View this post on Instagram

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

व्यायामाला सुट्टी नाहीच!

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री रकुल प्रीत सिंह तिच्या फिटनेससाठी ओळखली जातो. कितीही व्यस्त शेड्युल असले तरी ती आपल्या व्यायामाला प्रथम प्राधान्य देते. ती आपले कसरत सत्र कधीच सोडत नाही. अलीकडे, रकुलचे व्यायाम करतानाचे फोटो समोर आले आहेत, ज्यात तिने नारंगी रंगाचे पट्टे असलेली योगा पँट परिधान केली आहे. या आऊटफिटमध्ये ती बरीच कम्फर्टेबल दिसत आहे.

रकुलचा सूर्य नमस्कार

या अगोदरही तिने सूर्य नमस्कार करतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती आपली टोन्ड बॉडी फ्लाँट करताना दिसली होती (How yoga become stress buster for rakul preet singh).

View this post on Instagram

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

चित्रपटांची रांग

रकुलच्या वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले, तर तिच्या हातात बॉलिवूड आणि साऊथचे अनेक चित्रपट आहेत. शंकर दिग्दर्शित कमल हासनच्या ‘इंडियन 2’मध्ये ती झळकणार आहे. अजय देवगनच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या एका चित्रपटाच्य शूटिंगमध्ये ती सध्या व्यस्त आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

या अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरूवात ‘गिल्ली’ या कन्नड चित्रपटापासून केली होती. यानंतर ती तामिळ चित्रपट आणि तेलगू चित्रपटांमध्येही दिसली. तिने 2014 मध्ये ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटा नंतर रकुल प्रीत सिंह ‘अय्यारी’ आणि ‘दे दे प्यार दे’ सारख्या चित्रपटात झळकली होती. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​याच्यासमवेत ‘मरजावाँ’ या चित्रपटात रकुल प्रीत सिंह दिसली होती.

(How yoga become stress buster for rakul preet singh)

हेही वाचा :

Follow Us
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?