AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Covid-19 | अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला कोरोनाची लागण, पोस्ट शेअर करत केले आवाहन!

2020 हे वर्ष सर्वांसाठी अतिशय कठिण गेले आहे. सामान्य मानसांपासून ते सेलेब्रिटीपर्यंत कोरोना व्हायरल पोहचला आहे.

Covid-19 | अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला कोरोनाची लागण, पोस्ट शेअर करत केले आवाहन!
| Updated on: Dec 22, 2020 | 4:42 PM
Share

मुंबई : 2020 हे वर्ष सर्वांसाठी अतिशय कठिण गेले आहे. सामान्य मानसापासून ते सेलेब्रिटीपर्यंत कोरोना व्हायरल पोहचला आहे. वरुण धवन, नीतू कपूर, कृती सेनन, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलेब्रिटी देखील कोरोना पॉझिटिव्ह आले होते. आता बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन रकुलने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. (Actress Rakul Preet Singh Corona Positive)

पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला तुमच्या सर्वांना सांगायचे आहे की, मी कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. मी स्वत: ला क्वारंटीन केले आहे. मला बरं वाटतंय आणि छान विश्रांती घेईन जेणेकरून मी पुन्हा शूटवर जाऊ शकेन. माझ्याशी भेटलेल्या लोकांनी त्यांची कोरोना चाचणी करुन घेण्याची विनंती, धन्यवाद आणि सुरक्षित रहा.

View this post on Instagram

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

रकुल प्रीत हिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अर्ध्या तासात हजारो लोकांना हे पोस्टला लाईक केले. रकुल हि सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होती. नुकतीच ती सुट्टीसाठी मालदीवला गेली होती. तिथून रकुलने सोशल मीडियावर सर्वात हॉट फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करताच व्हायरल झाले होते.

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात, रकुल प्रीतचे नाव ड्रग्जच्या तपासणीत पुढे आले होते. रकुलला एनसीबीने 25 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले होते. एनसीबीने रकुल प्रीत सिंहची बऱ्यात तास चाैकशी केली होती. रिया चक्रवर्तीच्या चौकशीनंतर रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान यांची नावे समोर आली होती.

अभिनेत्री नीतू कपूर बऱ्याच दिवसानंतर तिच्या आगामी ‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. चंदिगडमध्ये शूटिंगदरम्यान नीतू कपूरचा कोरोना रिसोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. याची माहिती मुलगी रिद्धिमा कपूरने दिली. रिद्धिमाने ही बातमी इन्स्टाग्रामवर शेअर केली होती.

रिद्धिमा कपूरने आईबरोबर एक फोटो शेअर केला आहे, कॅप्शनमध्ये रिद्धिमाने लिहिले होते की, “तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि आशिर्वाद त्याबद्दल धन्यवाद.” गुरुवारी नीतूने कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले होते.

संबंधित बातम्या : 

Revealed | नव्या वर्षात कंगना रनौतची ‘केदारनाथ’ वारी!

Sussanne Khan | हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानविरोधात गुन्हा

(Actress Rakul Preet Singh Corona Positive)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.