Budget 2020: अर्थसंकल्पात कुणाला किती कर सवलत?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2020-21 च्या अर्थसंकल्पात कर सवलतीची घोषणा केली आहे (Tax rate Tax slabs in Budget 2020).

Budget 2020: अर्थसंकल्पात कुणाला किती कर सवलत?

Budget 2020 नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2020-21 च्या अर्थसंकल्पात नव्या कर रचनेची घोषणा केली आहे (Tax rate Tax slabs in Budget 2020).  जर तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला एक रुपयाही टॅक्स भरावा लागणार  नाही. मात्र जर तुमचं उत्पन्न 5 लाखांच्या वर असेल, तर तुमचं करपात्र उत्पन्न हे अडीच लाखापासून मोजलं जाईल. म्हणजे अडीच ते 5 लाख रुपयांसाठी 5 टक्के,  5 ते 7 लाख 50 हजारांसाठी 10 टक्के याप्रमाणे कर आकारला जाईल. (Tax rate Tax slabs in Budget 2020).

कररचना – टॅक्स स्लॅबमध्ये बदल

 • अडीच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
 • उत्पन्न 2.5 ते 5 लाख – 5 टक्के कर (आधीही 5 टक्के)
 • उत्पन्न 5 लाख ते 7.5 लाख – 10 टक्के कर (आधी 20 टक्के)
 • उत्पन्न 7.5 लाख ते 10 लाख – 15 टक्के कर (आधी 20 टक्के)
 • उत्पन्न 10 लाख ते 12.5 लाख – 20 टक्के कर (आधी 30 टक्के)
 • उत्पन्न 12.5 ते 15 लाख – 25 टक्के कर (आधी 30 टक्के)
 • उत्पन्न 15 लाखांपेक्षा अधिक – 30 टक्के कर (कोणतीही सवलत नाही)

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केल्याप्रमाणे मागील वर्षीप्रमाणेच याहीवर्षी 2.5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. 2.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 5 टक्के कर लागणार आहे. यानंतर 5 लाख ते 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 10 टक्के कर असेल. या कररचनेची घोषणा होण्याआधी 5 लाख ते 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 20 टक्के कर होता.

7.5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 15 टक्के कर द्यावा लागणार आहे. आधी हा 20 टक्के होता. 10 लाख ते 12.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील 30 टक्के कर आता 20 टक्के करण्यात आला आहे. 12.5 लाख ते 15 लाख रुपये उत्पन्नापर्यंत 30 टक्क्यांऐवजी 25 टक्के कर आकारण्यात येईल. मात्र, करसवलत मिळवण्यासाठी काही अटी देखील सांगण्यात आल्या आहेत.

जर तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला एक रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही. मात्र जर तुमचं उत्पन्न 5 लाखांच्या वर असेल, तर तुमचं करपात्र उत्पन्न हे अडीच लाखापासून मोजलं जाईल. म्हणजे अडीच ते 5 लाख रुपयांसाठी 5 टक्के, 5 ते 7 लाख 50 हजारांसाठी 10 टक्के याप्रमाणे कर आकारला जाईल.

कर सवलत कशी मिळणार?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत घोषणा केलेल्या कररचनेला जुन्या कररचनेचाही पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे करदात्यांना जुनी किंवा नवी कररचना स्वीकारता येणार आहे. मात्र, नव्या कररचनेतील कर सवलतीचा लाभ घ्यायचा असेल, तर मागील कररचनेनुसार मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच नव्या कररचनेचा फायदा घेतला तर विमा, गुंतवणूक, घराचं भाडं, मुलांचं शिक्षण सारख्या एकूण 70 मुद्द्यांवरील सूट मिळणार नाही. जुन्या कररचनेप्रमाणे कर भरला तर मात्र या 70 मुद्द्यांवरील सवलत घेता येईल.

नव्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कराचा दर 15 टक्के करण्यात आला आहे. जुन्या कंपन्यांसाठी हा कर 22 टक्के असणार आहे. कंपन्यांना देखील नवी आणि जुनी कररचना निवडण्याचा पर्याय आहे.

कर प्रक्रिया सोपी करण्याचा प्रस्ताव

 • आयकर परतावा अर्ज आधीच भरले जाणार
 • DIRECT DIVIDEND TRANSFER (DDT) पूर्णपणे हटवणार
 • कंपन्यांना डिव्हिडंटवर कर सवलत नाही
 • डिव्हिडंट घेणाऱ्याला कर द्यावा लागणार
 • DDT हटवण्यासाठी सरकारला 25,000 कोटी रुपयांचं नुकसान
 • पायाभूत क्षेत्रात गुंतवणुकीसाठी 100% करसवलत
 • स्टार्ट अपमध्ये EPOS नियमांमध्ये बदल
 • स्टार्ट अप सुरु करण्यांना करापासून सवलत
 • स्टार्ट अपच्या टर्नओव्हरची मर्यादा 25 कोटीवरुन वाढवून 100 कोटी
 • गृहनिर्माण योजनांना मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ
 • परवडणाऱ्या घर योजनांची कालमर्यादा 1 वर्षांनी वाढवली
 • Charity Institution ला UID ची सुविधा

एकूणच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेल्या कररचनेत मागील वर्षीप्रमाणेच घोषणा केली आहे. 5 ते 15 लाख रुपये उत्पन्न गटाला मात्र काहिसा दिलासा मिळाला आहे. या गटांना 5 ते 10 टक्क्यांचा फायदा मिळाला आहे.

व्हिडीओ:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *