AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात धबधब्याच्या ठिकाणी फिरायला जात असाल तर ‘या’ चुका करू नका

पावसाळ्यात अनेक उत्साही लोक धबधब्याच्या ठिकाणी किंवा जलप्रवाहाच्या ठिकाणी फिरण्याचा प्लॅन करतात. परंतु त्याठिकाणी पुरेशी माहिती ते घेत नाहीत. अशा ठिकाणी पावसाळ्यात अनेक दुर्घटना होण्याचा धोका असतो. त्यासाठी काही चुका टाळणं महत्त्वाचं आहे.

पावसाळ्यात धबधब्याच्या ठिकाणी फिरायला जात असाल तर 'या' चुका करू नका
waterfallImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 16, 2025 | 11:59 AM
Share

मावळ तालुक्यातील इंदोरी इथल्या कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरील लोखंडी पादचारी पूल कोसळून रविवारी झालेल्या दुर्घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाला. तर 38 पर्यटकांना बाहेर काढण्यात आलं असून त्यापैकी 18 जण जखमी आहेत. पावसाळा सुरू झाला की धबधब्यांच्या ठिकाणी, वाहत्या पाण्याच्या ठिकाणी, तलावांच्या ठिकाणी अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. परंतु त्याठिकाणी योग्य सोईसुविधा आहेत का, सुरक्षेचा बंदोबस्त आहे का, याबद्दलची माहिती अनेकांना नसते. अशा वेळी दुर्घटना घडतात आणि त्यात निष्पाप लोकांचा बळी जातो. अनेकदा लोक पुरेशी माहिती नसतानाही अनोळखी ठिकाणी जाण्याचं साहस करतात आणि दुर्घटनेचे शिकार होतात. पावसाळ्यात तुम्हीसुद्धा कुठे फिरायचा प्लॅन करत असाल तर या काही चुका टाळा. अन्यथा पावसाळी ट्रिप तुमच्या जीवावरही बेतू शकते.

  • पावसाळ्यात धबधब्यांच्या किंवा पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी छुपे धोके कधी येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे स्थानिक जागेची माहिती असणं, हवामानाचा अंदाज घेणं महत्त्वाचं असतं. त्याचसोबत जलस्रोतांची खोली न मोजता पोहणंही टाळलं पाहिजे. संरक्षक गोष्टींच्या बाबतीत माहिती करून घेणंही गरजेचं आहे.
  • पावसाळ्यात ओव्हरफ्लो, अचानक पूर, जोरदार प्रवाह, निसरडा भूभाग होण्याचा धोका वाढतो. अशा ठिकाणी अपघात रोखण्याची पहिली पायरी म्हणजे त्या जागेविषयी संपूर्ण माहिती घेणं. मुसळधार पावसात धबधब्याला जाणं पूर्णपणे टाळावं.
  • वाहत्या पाण्यात गुरुत्वाकर्षण शक्ती वेगळी असते. त्यामुळे प्रौढच नव्हे तर मुलंही संतुलन गमावू शकतात आणि बुडू शकतात.
  • अशा ठिकाणी जर कोणी बुडताना दिसलं तर लगेच मदतीसाठी कॉल करा, इतरांना सावध करा आणि आपत्कालीन सेवांना तातडीने कॉल करा. त्यानंतर बुडणाऱ्या व्यक्तीच्या मदतीसाठी लांब वस्तू किंवा तरंगतं उपकरण वापरा.
  • पाण्यातून व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर ते श्वास घेत आहेत की नाही हे तपासा. गरज वाटल्यास त्यांना सीपीआर द्या. त्या व्यक्तीला ब्लँकेट किंवा कपड्यांनी झाकून उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा. वैद्यकीय मदत येईपर्यंत त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवा.
  • पावसाळ्यात ट्रेकिंग किंवा हायकिंग जातानाही विशेष काळजी घ्यावी लागते. वनविभाग किंवा स्थानिक सरकारने अशा भागांसाठी दिलेली सावधगिरीची माहिती आणि निर्बंध जरूर वाचावं. त्याचप्रमाणे भूस्खलनप्रवण भाग आणि धोकादायक मार्ग टाळावेत.

पावसाळ्यात फिरायला जातानाचे काही टिप्स-

  1. फिरण्याच्या ठिकाणाबद्दल नीट माहिती घ्या, अचानक पुराच्या शक्यतेचं मूल्यांकन करा
  2. भेटीपूर्वी स्थानिकांचा सल्ला घ्या, ताज्या घडामोडींचा मागोवा घ्या
  3. तिथल्या हवामानाचा अंदाज घ्या
  4. लाइफ जॅकेट आणि इतर आपत्कालीन उपकरणं सोबत घेऊन जा
  5. हेल्पलाइन नंबर जवळ ठेवा, प्रतिबंधित क्षेत्रात जाणं टाळा
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.