हिवाळ्यात आजारी पडायचे नसेल तर या 5 गोष्टींचा करा आहारात समावेश
हिवाळ्यातील असे कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करु शकतात. थंडीच्या मोसमात निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे, शरीराला हिवाळ्यात होणाऱ्या संसर्गापासून बचाव करायचा असेल तर मग तुमच्या आहारत काही बदल केले पाहिजे.

Healthy food In winter : हिवाळा सुरु झाला की त्यानुसार आहारात बदल करणे गरजेचे आहे. कारण उन्हाळ्यात थंड पदार्थ खावे लागतात आणि हिवाळ्यात गरम पदार्थ खावे लागतात. आपल्या आहारात याचे पालन केल्याने आपण आपल्या शरीराला हवामानाशी जुळवून घेण्यास मदत करतो. पण ऋतूनुसार आहारात बदल करण्यामागे आणखी काही कारणे आहेत आणि त्यातील एक कारण म्हणजे ऋतूमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करणे. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये अनेक प्रकारचे रोग देखील येतात, ज्यामध्ये फ्लू, घशातील संसर्ग आणि अगदी फुफ्फुसाचा संसर्ग इत्यांदीचा समावेश आहे. त्यामुळे आहारात बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी, मजबूत प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे.
1. हिरव्या भाज्या
पालक आणि कोबी इत्यादी हिवाळ्यात उपलब्ध असलेल्या भाज्या हे आरोग्यासाठी चांगल्या आहेत. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकतात. पालक आणि इतर हिरव्या भाज्यांमध्ये आढळणारे कॅरोटीनॉइड्स, बीटा कॅरोटीन, ल्युटीन आणि इतर पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि हिवाळ्याच्या संसर्गापासून तुमचे संरक्षण करण्यास मदत करतात.
2. लिंबूवर्गीय फळे
आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक विशेष पोषक तत्वांची आवश्यकता असते आणि हे पोषक तत्व या लिंबूवर्गीय फळांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. हिवाळ्यात स्वस्त दरात मिळणारी संत्री तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप फायदेशीर आहे, तुम्ही रोज एक संत्री किंवा इतर कोणतेही लिंबूवर्गीय फळ खाऊन तुमची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवू शकता.
3. सुका मेवा
आपली प्रतिकारशक्ती चांगली करायची असेल तर सुक्या मेव्याचे सेवन देखील करू शकता. प्रथिने, पोटॅशियम आणि कॅल्शियमसह अनेक आवश्यक पोषक घटक बदाम, काजू, अक्रोड आणि मनुका यांसारख्या सुक्या फळांमध्ये आढळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. सुक्या मेव्याचे सेवन केल्याने हिवाळ्यात आजारी पडण्यापासून बचाव होतो.
4. दुग्धजन्य पदार्थ
शरीर निरोगी ठेवण्यासाठी दूध, दही, चीज आणि ताक इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. तसेच, प्रोबायोटिक्स इत्यादी रोगप्रतिकारक शक्ती वेगाने मजबूत करण्यासाठी कार्य करतात, ज्यामुळे तुम्हाला संक्रमणाशी लढण्यास मदत होते.
5. संपूर्ण धान्य
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपल्या आहारात संपूर्ण धान्यांचा समावेश करणे महत्वाचे आहे.जर तुम्ही तुमच्या आहारात संपूर्ण धान्याचा समावेश केला तर ते तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास देखील मदत करेल. कारण हे मॅग्नेशियम, लोह आणि जस्त, जीवनसत्त्वे आणि प्रथिने यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे.
