Solo Travelling : तुम्हीही प्लान करताय Solo Trip ? या गोष्टी बिलकूल विसरू नका..

Solo Trip : आजकाल तरुणांमध्ये सोलो ट्रिपचा ट्रेंड खूप लोकप्रिय झाला आहे. या ट्रिपमध्ये, एखादी व्यक्ती एकट्याने प्रवास करते आणि ठिकाणांना भेट देते. पण कधी कधी एकट्याने प्रवास करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. एकट्याने प्रवास करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Solo Travelling : तुम्हीही प्लान करताय Solo Trip ? या गोष्टी बिलकूल विसरू नका..
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 3:36 PM

Solo Travel Tips : गेल्या काही काळापासून सोलो ट्रॅव्हलचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. लोक बॅग भरून एकटेच सहलीला निघतात. सोलो ट्रिपची खास गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच प्रवास करण्याचा अनुभव खूपच रोमांचक असतो. पण काही लोक जे पहिल्यांदाच अशा ट्रिपवा जात असतील , त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. पहिल्यांदा असा एकटा प्रवासात काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जे पहिल्यांदाच एकट्याने प्रवास करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी सोलो ट्रिप हा काही खूप सोपा प्रवास नसतो. या काळात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्हीही पहिल्यांदाच एकट्या सहलीचा प्लॅन करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी जरूर जाणून घ्या आणि त्या लक्षात ठेवा.

ट्रिप प्लान करा

एकट्याने प्रवासाला निघण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या संपूर्ण सहलीचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. सहलीदरम्यान-जेवणाचा खर्च, राहण्याचा खर्च आणि येण्या-जाण्याचे भाडे, या सर्वा खर्चाचा अंदाज घया. याशिवाय तुम्ही ज्या ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत आहात त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

ओव्हरपॅकिंग नको

जर तुम्ही पहिल्यांदाच एकट्याने प्रवास करणार असाल तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीसाठी तयार असले पाहिजे. बर्‍याच वेळा आपल्याकडे जास्त माहिती नसते, ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एकट्याने प्रवास करताना, बरेच लोक खूप जास्त सामान बांधून घेतात, ज्यामुळे त्यांना सामान नेण्यात अधिक त्रास होतो. त्यामुळे गरजेपुरते सामान घ्या, ओव्हरपॅकिंग टाळा.

फॅमिलीशी संपर्क कायम ठेवा

तुम्ही कुठे एकटे फिरायला जात असाल तर तुमच्या सुरक्षिततेचीही काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या कुटुंबाच्या संपर्कात रहा. हे तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत मदत करू शकते. यासोबतच तुमचा प्रवासाचा कार्यक्रम, तुम्ही कुठे जाणार आहात, ते सर्व तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा.

प्लान बी ठेवा रेडी

कधीही एकट्याने प्रवास करताना अडचणी येऊ शकतात. अशा वेळी प्लान-बी नेहमी तयार ठेवा. एखादं रिझर्व्हेशन कॅन्सल झालं किंवा ज्या जागी गेलात, ती जागा आवडली नाही, तर हातात दुसरा प्लान आणि ऑप्शन ठेवा. त्यामुळे तुमची ट्रीप खराब होणार नाही आणि तुमचा मूड-ऑफही होणार नाही.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.