AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीच्या दिवसांत केस आणि त्वचेचे होऊ शकते नुकसान, तज्ज्ञांकडून जाणून घ्या बचावाचे उपाय

केस धुतल्यानंतर ते तसेच मोकळे सोडण्याच्या सवयीमुळे केसांचे जास्त नुकसान होऊ शकते. थंडीत केस व त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया.

थंडीच्या दिवसांत केस आणि त्वचेचे होऊ शकते नुकसान, तज्ज्ञांकडून जाणून घ्या बचावाचे उपाय
Image Credit source: Freepik
| Updated on: Dec 28, 2022 | 10:35 AM
Share

नवी दिल्ली – थंडीच्या ऋतूमध्ये (winter) आपल्या त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या (skin problem) उद्भवतात. हवेतील आर्द्रता (ओलावा) आणि तापमानाची पातळी हे दोन्ही कमी झाल्यामुळे त्वचा कोरडी होणे, त्वचा व केसांमध्ये खाज सुटणे, कोरडेपणा आणि खडबडीतपणा (dry skin and hair) वाढतो. त्यामुळेच थंड वातावरणात लोकांच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक (naturl glow on skin) कमी होते, तसेच केसांमधील मॉयश्चरायझरही कमी होते. थंड हवा आणि हीटरमधून मिळणारी कृत्रिम उष्णता यामुळे त्वचा आणि केसांमधील आर्द्रता कमी होते. ज्यामुळे कोरडी त्वचा तसेच केसांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. ज्यापासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असते.

थंडीच्या दिवसात केस व त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया.

1) त्वचा मॉयश्चराइज करणे – त्वचेची योग्यप्रकारे काळजी घ्यायची असेल तर रोजच्या दिनचर्येमध्ये एका चांगल्या मॉयश्चरायजरचा समावेश करणे महत्वाचे ठरते. यामुळे आपली त्वचा हायड्रेटेड तर राहतेच त्याशिवाय त्वचेला चमकही मिळते.

2) जास्तीत जास्त द्रव पदार्थ पिणे – आपली त्वचा हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे असते. थंडीत तशीही तहान कमी लागते. त्यामुळे त्वचेतील ओलावा कायम राखण्यासाठी दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी अथवा काही द्रव पदार्थ प्यायले पाहिजेत.

3) केसांना नियमितपणे तेल लावावे – केसांना नियमितपणे तेल लावल्याने त्यांचे पोषण तर होतेच पण हे स्कॅल्पसाठी आणि केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. थंडीच्या दिवसांत केसांना नैसर्गिक तेल मिळणे खूप गरजेचे असते. नियमितपणे तेल लावल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते.

4) केस धुतल्यानंतर पूर्णपणे वाळवा – काही व्यक्ती केस धुतल्यानंतर ते तसेच सोडून देतात, ज्यामुळे केसांचे अधिक नुकसान होऊ शकते. म्हणूनच केस धुतल्यानंतर वाऱ्यावर किंवा पंख्याखाली नीट, पूर्णपणे वाळवावेत. मात्र केस टॉवेलने जोरजोरात पुसू नयेत, अन्यथा ते खराब होऊ शकतात. केस ओले असताना त्यांची मुळं कमकुवत असतात, त्यामुळे ते जोरात पुसले अथवा झटकले तर ते तुटू अथवा गळू शकतात. म्हणून केस धुतल्यावर योग्यप्रकारे काळजी घेऊन ते वाळवावेत.

5) आठवड्यात 1 किंवा 2 पेक्षा अधिक वेळेस केस धुवू नयेत – शांपूच्या जास्त वापराने आपल्या स्कॅल्पवरील संरक्षणात्मक तेलाचा थर हटू शकतो. त्यामुळेच एका आठवड्यात एक किंवा दोनपेक्षा अधिक वेळेस शांपूने केस धुवू नयेत. तसेच केस धुण्यापूर्वी पुरेसे तेल लावावे. सौम्य शांपूचा वापर करावा.

6) कंडीशनर वापरायला विसरू नका – तुमचे केस मॉयश्चराइज करण्यासाठी आणि केसांच्या सर्वात बाहेरील थराचे संरक्षण करण्यासाठी केस शांपूने धुतल्यानंतर कंडीशनरचा वापर करणे आवश्यक महत्वपूर्ण ठरते. यामुळे केस चमकदार आणि मऊ तर होतातच पण त्यामध्ये गुंता होत नाही व ते जास्त तुटतही नाहीत. त्यामुळे केस धुतल्यानंतर कंडीशनर अवश्य वापरावे.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.