Health Diet : निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी रोजच्या आहारात या ‘8’ पदार्थांचा समावेश हवाच

आपल्याला बर्‍याचदा निरोगी खाणे, स्नॅकचे सेवन कमी करणे आणि कॅलरी नियंत्रित करण्याचा सल्ला दिला जातो.

Health Diet : निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी रोजच्या आहारात या '8' पदार्थांचा समावेश हवाच
निरोगी आहार
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 11:12 AM

मुंबई : आपल्याला बर्‍याचदा निरोगी खाणे, स्नॅकचे सेवन कमी करणे आणि कॅलरी नियंत्रित करण्याचा सल्ला दिला जातो. निरोगी आहारामध्ये फळे आणि भाज्या इत्यादींचा समावेश होतो. यात पॅकेज्ड फूडचा समावेश होतो. परंतु जास्त कॅन केलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. अमेरिकन जर्नल ऑफ लाइफस्टाईल मेडिसिनच्या मते, पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड पदार्थांमध्ये लपवलेले काही तत्व आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. रोजच्या आहारात आपण कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. हे आपण बघणार आहोत. (Include these 8 foods in your daily diet to stay healthy)

पालक

आपल्या सर्वांना माहित आहे की पालक हा प्रथिने, फायबर आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे. पालकमध्ये ओमेगा -3 आणि फोलेट देखील असते. या दोन्ही गोष्टीमुळे हृदयरोग, ऑस्टिओपोरोसिस आणि उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. असे बरेच लोक आहेत ज्यांना पालकांची चव आवडत नाही आणि ते खाण्यास टाळाटाळ करतात. परंतु आपल्या आहारात पालक समाविष्ट करण्याचे बरेच फायदे आहेत.

दही

दह्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही. दही ऑस्टिओपोरोसिस, रक्तदाब, केस आणि हाडे यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते.

अंडी

हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अभ्यासानुसार अंड्यातील पिवळ बलकमध्ये 200 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते, जे खूप जास्त आहे. म्हणून, अंड्यातील पिवळ बलक खाण्यापेक्षा आपण अंड्यातील पांढरा भाग खाल्ला पाहिजे ते आरोग्यदायी आहे. त्यामध्ये असलेले पोषक हृदय रोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. नाश्त्यामध्ये आपण अंड्याच्या चवदार डिश तयार करून खाऊ शकतो.

अक्रोड

अक्रोड खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या मते, अक्रोडमध्ये पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते. हे आपल्यासाठी चांगले आहे विशेष म्हणजे, अक्रोडमध्ये अल्फा-लिनोलेनिक आणि लिनोलिक अॅसिड असतात, जे अंतर्गत अवयव निरोगी ठेवण्यासाठी दाहक-विरोधी असतात.

रताळे

रताळे हे कॅरोटीन समृद्ध आहे, जे अँटीऑक्सिडेंट आहे. हे रक्तातील व्हिटॅमिन ए प्रभावीपणे वाढवते. रताळे हे पोषक आणि फायबर समृद्ध आहे. उकडून, बेकिंग, स्टीमिंग आणि तळण्यासह ते बर्‍याच प्रकारे खाल्ले जाते. भारतीय मोठ्या आवडीने रताळ्याचे सेवन करतात. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, बी 6, पोटॅशियम, मॅंगनीज आणि ल्युटीन इ. असतात. रताळे जांभळ्या, केसरी आणि पांढऱ्या रंगाचे असतात.

ब्रोकोली

‘ब्रोकोली’ची सुपर फूडमध्ये गणना केली जाते. ब्रोकोलीमध्ये लोह, व्हिटामिन ए, सी, पोटॅशियम, प्रथिने, कॅल्शियम, कर्बोदके आणि क्रोमियम असतात. विशेष म्हणजे ब्रोकोली खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत देखील होते आणि सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात तर ब्रोकोली खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

संत्री

संत्री हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. संत्री खायला बहुतेक लोकांना आवडते. संत्रीमध्ये व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. हे पांढर्‍या रक्त पेशी वाढविण्यास आणि संक्रमणास विरोध करण्यास मदत करते. सध्याच्या कोरोना काळात व्हिटॅमिन सी आपल्या शरीराला खूप आवश्यक आहे. यासाठी आहारात संत्रीचा समावेश केला पाहिजे.

किवी

किवी कमी कॅलरीज असणारे एक पौष्टिक फळ आहे. किवीमध्ये फोलेट आणि पोटॅशियम देखील आढळतात. किवी खाल्ल्याने पाचन शक्तीत वाढ होते. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. किवीमुळे सेरोटोनिन हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स शांत झोपेसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. किवीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include these 8 foods in your daily diet to stay healthy)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.