कोरोना काळात आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा !

कोरोना काळात आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा !

देशामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. यादरम्यान आपण आरोग्याची विशेष काळजी ही घेतली पाहिजे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 28, 2021 | 4:39 PM

मुंबई : देशामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. यादरम्यान आपण आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. सध्याच्या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप आवश्यक झाले आहे. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असले तर आपण कोरोना सारख्या गंभीर आजारापासून देखील दूर राहू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे म्हणजे चांगला आणि सकल आहार रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात नेमके काय घेतले पाहिजे. हे आज आपण बघणार आहोत. (Include these substances in the diet during the corona period)

ओट्स

ओट्स हा प्रथिनेचा चांगला स्रोत आहे, तसेच त्यामध्ये बीटा ग्लूकेन्स देखील आहेत. यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होते. 100 ग्रॅम ओट्समधून 12 ग्रॅम प्रोटीन मिळते. ओट्समुळे पचनक्रिया सुधारते आणि वजनही नियंत्रणात येते. ब्लड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे ओट्स हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ओट्स सारखा चांगला नाश्ता दुसरा काहीही असू शकत नाही.

नाचणी

नाचणी खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. नाचणीमध्ये कॅल्शीयम, फायबर, कर्बोदके, लोह, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी, अँटिऑक्सिडेंट्स आणि प्रथिने यासारखे अनेक पोषक घटक असतात. भाकरी, बिस्किटे, चिप्स, डोसा, उपमा, नाचणीच्या पिठाचे सूप देखील तयार करून आपण नाचणीचा आपल्या आहारात समावेश करू शकतो. यामुळे सध्याच्या काळात नाचणीचा आहारात समावेश केला पाहिजे.

मासे

जर आपली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असेल तर आपण आहारात मासाचा समावेश केला पाहिजे. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा पोषक तत्व आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन-सी केवळ आपल्या प्रतिकारशक्तीसाठी चांगले नाही तर पुनरुत्पादक प्रक्रिया आणि डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. मासे लोहाचेही उत्तम स्रोत मानले जाते, जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. लोह आपल्या फुफ्फुसातून इतर ऊतकांमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्याचे कार्य करते.

अंडी

अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात.

अक्रोड

अक्रोड बुद्धीला तल्लख ठेवण्याबरोबरच, शरीराला दिवसभराची ऊर्जा देण्याचे कार्य करते. अक्रोड हा सुक्यामेव्यातील असा एक घटक आहे जो आरोग्याबरोबरच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. अक्रोडमध्ये ओमेगा-3 हा घटक असतो, जो त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करतो. अक्रोड ही स्कीन स्क्रबसाठी वापरला जाणारा मुख्य घटक आहे. मात्र, या व्यतिरिक्त अक्रोड आपल्याला अनेक आजारांपासून देखील दूर ठेवतो

बदाम

बदामांमध्ये प्रथिने, फायबर, व्हिटामिन ई, कॅल्शियम, जस्त सारखे अनेक पौष्टिक घटक असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. दररोज आपल्या नाश्त्यामध्ये बदामांचा समावेश करून आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतात. बदामांमध्ये उच्च फायबर, असंतृप्त चरबी आणि कमी कार्बोहायड्रेट्स असतात. यासह, बदाम कमी ग्लायसेमिक निर्देशांक श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत, ज्याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये ग्लूकोजचे प्रमाण बरेच कमी आहे.

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Include these substances in the diet during the corona period)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें