AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खाण्यासाठीच नव्हे, या कारणासाठीही बटाट्याचा होतो उपयोग; तुम्हाला माहीतही नसेल

बटाटा हा बहुगुणी आहे. बटाट्याचे अनेक औषधी फायदे आहेत. जखमांवर उपचार करणे, त्वचेच्या समस्या दूर करणे, कपड्यांवरील डाग काढणे, आणि घरगुती स्वच्छता यांसारख्या विविध कामासाठी बटाट्याचा प्रभावी वापर करता येतो. वनस्पतींच्या वाढीसाठी बटाट्याच्या सालाचाही उपयोग कसा करता येतो.

खाण्यासाठीच नव्हे, या कारणासाठीही बटाट्याचा होतो उपयोग; तुम्हाला माहीतही नसेल
बहुगुणी बटाटा
| Updated on: Nov 29, 2024 | 5:42 PM
Share

जगभरातील नागरिकांच्या आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बटाटा होय. काही भागात तर रोजच बटाट्याची भाजी केली जाते. कारण त्या ठिकाणी बटाटा अधिक पिकतो. बाजारात सहजपणे उपलब्ध होणारा आणि झटपट रेसिपी करता येणारा असा हा पदार्थ आहे. शाकाहारी असो की मांसाहारी प्रत्येकाचा बटाटा फेव्हरेट असतो. बटाटा खाण्यासाठी उपयुक्त आहेच. पण त्या पलिकडेही बटाट्याचे गुणधर्म आहेत. बटाटा हा आरोग्यदायीही आहे. त्याचा औषधी वापरही करता येतो. बटाट्याचा कसा बहुगुणी वापर करता येतो त्यावर टाकलेला हा प्रकाश.

जखमेवर

बटाटा जखमेसाठी उपयुक्त ठरतो. त्यासाठी, उकडलेला बटाटा चांगला किसून त्यात बटाट्याचा रस घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण जखमेवर लावल्यास वेदना कमी होऊ शकतात आणि सूज कमी होईल.

त्वचेच्या समस्यांसाठी

बटाटा त्वचेच्या समस्यांना दूर करण्यात मदत करतो. बटाटा त्वचेवरील काळे डाग कमी करून त्वचेला एकसारखा रंग आणि चमक प्रदान करतो. बटाट्याचा रस त्वचेला लावून थोड्यावेळाने त्वचा धुवून काढल्यास सुरकुत्या कमी होतात. त्यामुळे तुमचं वय दिसत नाही.

कच्च्या पदार्थांच्या डागांसाठी

कपड्यांवर अन्न पदार्थ किंवा दारूच्या कच्च्या डागांना साफ करण्यासाठी बटाटा उपयुक्त आहे. त्यासाठी, एका पातेल्यात पाणी घ्या आणि त्यात चांगला किसलेला बटाटा घाला. काही वेळाने या मिश्रणाला गाळून डाग असलेल्या ठिकाणी लावून ठेवावे. डाग साफ होईपर्यंत हे प्रक्रिया करत राहा.

माश्या हटवण्यासाठी

पत्रांवर आलेल्या माश्या काढण्यासाठी बटाटा मदत करतो. त्यासाठी, मीठ, डिटर्जंट, आणि बेकिंग सोडा मिश्रण करून बटाट्याचे दोन भाग करावे. त्यात हे मिश्रण लावून ते जरा वेळ स्क्रब करा आणि नंतर धुऊन टाका.

ग्लासच्या स्वच्छतेसाठी

ग्लास स्वच्छ करण्यासाठी बटाटा वापरता येतो. एक तुकडा बटाटा घ्या आणि ग्लासच्या कडा स्वच्छ करा. त्यानंतर साध्या पाण्याने ग्लास धुवून काढा. यामुळे ग्लासवरील कचरा सहजपणे काढता येईल.

बुटांसाठी

बुटातील कचरा काढण्यासाठी बटाटा वापरता येतो. एक तुकडा बटाटा घ्या आणि बुटांभोवती स्क्रब करा. यामुळे बुटातील धूळ आणि घाण सहजपणे काढता येईल.

वनस्पतींच्या वाढीसाठी

बटाटाच्या सालाला पाण्यात भिजवून त्याचा वापर झाडांसाठी खत म्हणून केला जाऊ शकतो. यामुळे झाडे अधिक वेगाने वाढतील.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....