AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात सुंदर सूर्यास्त पाहण्यासाठी भारतातील ‘या’ 5 ठिकाणी द्या भेट

सुर्यास्ताचे दृश्य पाहणे हे इतके विलोभनीय आहे की ते आपल्या मनाला मंत्रमुग्ध करून टाकते. सहसा प्रत्येकजण हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असतो कारण सूर्यास्ताचे हे सौंदर्य म्हणजेच जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा आकाशात एक लालसरपणा येतो जो पाहणे अगदी मंत्रमुग्ध करणारे असतो. अशातच आपल्या भारतात असे काही 5 ठिकाणे आहेत जेथुन सूर्यास्ताचे सुंदर दृश पाहू शकता. चला या शहरांबद्दल जाणुन घेऊयात...

सर्वात सुंदर सूर्यास्त पाहण्यासाठी भारतातील 'या' 5 ठिकाणी द्या भेट
सर्वात सुंदर सूर्यास्त पाहण्यासाठी भारतातील 'या' 5 ठिकाणी द्या भेटImage Credit source: Arun Siddharth/Getty Images
| Edited By: | Updated on: Jun 11, 2025 | 5:05 PM
Share

आपल्यापैकी अनेकजण हे कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असतात. अशा वेळेस प्रत्येकजण हिल्स स्टेशन्स, निसर्गाच्या सानिध्यात जात असतातच, पण तुम्ही कधी अशा ठिकाणी जाण्याचा विचार का करत नाही जे वेगळे असण्यासोबतच खुप सुंदर देखील आहे. कारण आपण असे काही क्षण रोज पाहत असतो, पण तिच गोष्ट आपण ठराविक ठिकाणांहुन पाहणे आपल्या मनाला भुरळ पाडते. येथे आपण सुर्यास्ताच्या दृश्याबद्दल बोलत आहोत. कारण आजकाल वाढते शहरीकरण यामुळे सुर्यास्त पाहायला फारस मिळत नाही. त्यातच आपण जर एखाद्या चौपाटी किंवा घराच्या गच्चीत संध्याकाळी जातो तेव्हा आपण सुर्यास्‍त पाहत असतो, पण आपल्या देशातील काही शहरांमधून सूर्यास्त पाहणे अगदी सुंदर वाटते. तुम्ही सुद्धा या सुर्यास्ताच्या दृश्याचा विलोभनीय क्षण अनुभवण्यासाठी तुमच्या जोडीदारासह , सुंपूर्ण कुटुंबासह किंवा अगदी मित्रांसह या 5 टॉप शहरांमध्ये जाऊ शकतात.

समुद्रकिनारा असो किंवा डोंगरभागांमधुन मावळणारा सूर्य, दोन्हीही तितकेच शांत व सुंदर आहेत. आपल्या देशात असे अनेक सुंदर सूर्यास्त बिंदू आहेत जिथे तुम्हाला मावळत्या सूर्याचे विहंगम दृश्य पाहता येते. चला तर मग जाणून घेऊयात या 5 शहरांबद्दल…

भारतातील टॉप 5 सूर्यास्ताची ठिकाणं

1- टायगर हिल, दार्जिलिंग, पश्चिम बंगाल

दार्जिलिंगमधील टायगर हिल हे त्याच्या मनमोहक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दृश्यांसाठी ओळखले जाते. येथून तुम्हाला हिमालयाच्या शिखरांवरून, विशेषतः आकाशात नारंगी आणि गुलाबी रंगाच्या छटा पसरवणाऱ्या कांचनजंगा शिखरावर हळूहळू मावळणारा सूर्य दिसतो. निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी हे दृश्य स्वर्गापेक्षा कमी नाही.

2- कन्याकुमारी, तामिळनाडू

भारताच्या दक्षिणेकडील टोकावरील कन्याकुमारी हे सूर्यास्त पाहण्यासाठी सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. त्याचबरोबर कन्याकुमारी हे आपल्या देशातील एक असे ठिकाण आहे, जिथे बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर एकत्र येतात. या तीनही दिशांचे पाणी कन्याकुमारीतील या खास ठिकाणी मिळते आणि या तिघांच्या संगमावर होणारा सूर्यास्त एक अद्वितीय आणि इतके विलोभनीय आहे की तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. येथून सूर्यास्त पाहणे खरोखरच एक संस्मरणीय क्षण आहे.

3- वकारला, केरळ

केरळा येथील वकारला समुद्र किनाऱ्यावरून सुर्यास्त पाहणे हे एक असे दृश्य आहे की जणू समुद्र सूर्यालाच गिळंकृत करत आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मावळतीची संध्याकाळ, शांत लाटा आणि लालसरपणाने रंगलेले आकाश अगदी मनमोहक आणि विहंगम दृश्य पाहता येते. जर तुम्हालाही सुर्यास्‍त पाहण्याचं वेड असेल आणि तुम्ही एका चांगल्या सूर्यास्ताच्या ठिकाणाच्या शोधात असाल, तर हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

4- ताजमहाल, आग्रा, उत्तर प्रदेश

प्रेमाचे प्रतीक असलेला ताजमहाल सूर्यास्ताच्या वेळी इतकं अदभुत दिसतो की ते दृश्य तुम्ही पाहतच राहाल. यमुना नदीच्या काठावर वसलेले हे पांढरे संगमरवरी समाधीस्थळ सूर्यास्त होताच सोनेरी, नारिंगी आणि गुलाबी रंगात बदलते. हे दृश्य इतके मनमोहक आहे की त्याचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे.

5- कच्छचे रण, गुजरात

कच्छच्या रणातील विशाल पांढरे मिठाचे वाळवंट हे सूर्यास्त पाहण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. सूर्यास्त होताच, ही पांढरी चादर वेगवेगळ्या रंगांनी म्हणजेच पिवळ्या केशरी रंगात बदलते. ज्यामुळे एक अनोखा देखावा निर्माण होतो. पौर्णिमेच्या रात्री येथे सूर्यास्त पाहणे आणखी खास असते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.