AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या खाद्यसंस्कृतीच इंटरनॅशनल रिपोर्टमध्ये कौतुक, कुठल्या देशातील खाणं बेकार?

भारतात मिलेट्सबद्दल लोकांना ज्या प्रकारे जागरुक केलं जातय त्याचाही उल्लेख आहे. मिलेट्सच सेवन भारतात बऱ्याच काळापासून सुरु आहे. मिलेट्स सेवनासाठी भारतात अनेक अभियान चालवली जात आहेत.

भारताच्या खाद्यसंस्कृतीच इंटरनॅशनल रिपोर्टमध्ये कौतुक, कुठल्या देशातील खाणं बेकार?
non vegetarian food
| Updated on: Oct 11, 2024 | 3:30 PM
Share

भारताचा खाद्य उपभोग पॅटर्न G 20 देशांमध्ये सर्वाधिक स्थायी आणि पर्यावरण अनुकूल आहे. लेटेस्ट लिविंग प्लॅनेट रिपोर्टच्या रिसर्चमध्ये ही बाब समोर आलीय. इंडोनेशिया आणि चीन G 20 अर्थव्यवस्थांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांचा डाएट पॅटर्न पर्यावरणाच्या दृष्टीने दुसऱ्या स्थानावर आहे. डाएट पॅटर्न हा पर्यावरण अनुकूल आहे. रिपोर्टमध्ये अमेरिका, अर्जेंटीना आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांच्या डाएट पॅटर्नला सर्वात खराब रँकिंग देण्यात आली आहे. या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात फॅटी आणि शुगरी फूड्सच्या सेवनामुळे लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढतेय. या देशांमध्ये जवळपास अडीच कोटी लोक ओव्हरवेट आहेत, असा रिपोर्टमध्ये इशारा देण्यात आलाय. 890 मिलियन लोक लठ्ठपणाने बाधित आहेत.

भारतात मिलेट्सबद्दल लोकांना ज्या प्रकारे जागरुक केलं जातय त्याचाही उल्लेख आहे. मिलेट्सच सेवन भारतात बऱ्याच काळापासून सुरु आहे. मिलेट्स सेवनासाठी भारतात अनेक अभियान चालवली जात आहेत. त्यात लोकांना मिलेट्स सेवनामुळे होणारे फायदे सांगितले जातायत. भारतात मिलेट्स सेवनाच प्रमाण वाढवण्यासाठी कॅम्पने डिजाइन करण्यात आलं आहे. मिलेट्स आरोग्याबरोबर वातावरणासाठी सुद्धा उपयुक्त आहेत.

मिलेट्समध्ये भारत आघाडीवर

भारत सर्वात मोठा मिलेट्स उत्पादक देश आहे. जागतिक उत्पादनात भारताचा वाटा 41 टक्के आहे. मिलेट्सची विक्री वाढवण्यासाठी सरकारकडून अनेक पावलं उचलण्यात आली आहेत. यात राष्ट्रीय मिलेट अभियान, मिलेट मिशन आणि ड्राऊट मिटिगेशन प्रोजेक्ट आहे. भारतीय भोजनाबद्दल बोलायच झाल्यास इथे वेजिटेरियन आणि नॉन वेजिटेरियन जेवण सुद्धा मिळतं. उत्तरेकडे डाळ, गव्हाच्या चपातीसह मीट बेस्ड गोष्टी खाल्ल्या जातात. दक्षिणेबद्दल बोलायच झाल्यास तांदूळ आणि संबंधित फर्मेंटेड फूड्सच सेवन केलं जातं. यात इडली, डोसा आणि सांभार आहे. त्याशिवाय भरपूर लोक मासे आणि मीट सेवन करतात.

भारताचा पॅटर्न फॉलो करण्याचा सल्ला

2050 पर्यंत जगातील सर्व देशांनी भारताचाच डाएट पॅटर्न स्वीकारला, तर यामुळे वातावरण बदल वाढणार नाही. जैव विविधतेची हानी होणार नाही. नैसर्गिक साधनसंपत्ती बरोबर अन्न सुरक्षा धोक्यात येणार नाही असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.