फ्रिजमध्ये बर्फाचं डोंगर झाला आहे? फ्रिज बंद करू नका, फक्त हे एक बटन दाबा आणि बर्फ गायब!
फ्रिजमध्ये साचलेला बर्फाचा ढीग काढण्यासाठी अनेकजण फ्रिज बंद करून तासन्तास वाट पाहतात. पण हे अजिबात गरजेचं नाही! कारण तुमच्या फ्रिजमध्ये एक असं बटण आहे जे फक्त दाबलं की बर्फ झपाट्याने वितळायला लागतो.

घरात जुना किंवा सिंगल डोअर फ्रिज असेल तर तुम्हीही हा अनुभव घेतला असेल फ्रीजरमध्ये बर्फाचा थर चढलेला असतो आणि त्याला हटवण्यासाठी आपण थेट फ्रिजचं मेन स्विच बंद करतो. मग काही तास वाट बघायची, आतले पदार्थ बिघडण्याची चिंता, आणि शिवाय बर्फ वितळायला लागणारा वेळ… पण आता हे सगळं टाळता येऊ शकतं फक्त फ्रिजमध्ये असलेल्या एका छोट्याशा ‘डीफ्रॉस्ट बटणामुळे’.
होय, तुमच्या फ्रिजमध्ये एक अत्यंत उपयुक्त पण दुर्लक्षित फिचर असतो मॅन्युअल डीफ्रॉस्ट बटण, जो टेम्परेचर कंट्रोल नॉबच्या जवळच असतो. खूप कमी लोकांना याची माहिती असते, पण ही माहिती मिळाल्यावर फ्रिज चालू ठेवूनही तुम्ही बर्फ वितळवू शकता. चला, जाणून घेऊया या बटणाची कमाल आणि वापराचं योग्य तंत्र.
डीफ्रॉस्ट बटण म्हणजे नेमकं काय?
मॅन्युअल डीफ्रॉस्ट बटण हे एक छोटं गोलसर बटन असतं जे सहसा फ्रिजच्या आत, तापमान नियंत्रण नॉबच्या आजूबाजूला असतं. याचा उपयोग तुम्हाला संपूर्ण फ्रिज बंद न करता डीफ्रॉस्टिंग प्रक्रिया सुरू करण्यासाठी होतो. सिंगल डोअर किंवा जुन्या फ्रिजमध्ये हे बटन असण्याची शक्यता अधिक असते.
हे कसं काम करतं?
फ्रीजरच्या आतल्या थंड हवेमुळे आणि आर्द्रतेमुळे फ्रॉस्ट म्हणजे बर्फ तयार होतं. जास्त बर्फ झालं की फ्रिजची कूलिंग क्षमता कमी होते, वीजेचा वापर वाढतो आणि फ्रिजच्या कॉम्प्रेसरवरही ताण येतो. अशावेळी हे डीफ्रॉस्ट बटण दाबल्यावर फ्रीजरमधल्या coils जवळील हीटिंग एलिमेंट सक्रिय होतं.
यामुळे बर्फ हळूहळू वितळायला लागतं. बटन दाबल्यावर तुम्हाला हलकंसं क्लिकसारखं आवाज येतो आणि कॉम्प्रेसर काही वेळ बंद होतो. त्यानंतर उष्णतेमुळे बर्फ वितळतं आणि ते पाण्याच्या स्वरूपात एक पाईपमधून खाली कॉम्प्रेसरजवळ असलेल्या ट्रेमध्ये जमा होतं.
त्यानंतर काय?
या प्रक्रियेनंतर तुम्हाला दुसरं काहीच करायचं नसतं. डीफ्रॉस्टिंग पूर्ण झाल्यावर फ्रिज स्वतःहून रीसेट होतो आणि पुन्हा नॉर्मल कूलिंग मोडमध्ये काम करू लागतो. ट्रेमध्ये थोडंसं पाणी दिसणं हे सामान्य आहे आणि काळजीचं कारण नाही.
या बटणाच्या वापराचे फायदे
फ्रिज बंद करण्याची गरज नाही
आतले अन्नपदार्थ सुरक्षित राहतात
वीजेची बचत होते
फ्रिजचा परफॉर्मन्स सुधारतो
कॉम्प्रेसरला होणारा ताण कमी होतो
फ्रिजचे आयुष्य वाढते
वापरणं अतिशय सोपं आणि वेळ वाचवणारं
