उरलेल्या भातापासून बनवायचं काय ? जाणून घ्या ‘या’ 5 झटपट रेसिपी

अनेकदा घरात जास्तीचा भात शिजवला जातो आणि दुसऱ्या दिवशी तो शिल्लक राहतो, जो बरेच लोकं टाकून देतात. मात्र, शिल्लक राहिलेल्या भाताचा योग्य प्रकारे वापर केल्यास अनेक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवता येतात. चला या काही रेसिपी जाणून घेऊयात.

उरलेल्या भातापासून बनवायचं काय ? जाणून घ्या या 5 झटपट रेसिपी
उरलेल्या भातापासून करायचं काय ?
| Edited By: | Updated on: Jul 11, 2026 | 2:24 PM

रात्रीच्या जेवणानंतर अनेकदा भात शिल्लक राहतो. त्यानंतर हा भात फ्रिजमध्ये पडून राहतो. पण या उरलेल्या भातापासून काही मिनिटांतच एकदम चविष्ट पदार्थ बनवू शकता. यामुळे केवळ अन्न वाया जात नाही, तर वेळ आणि पैशांचीही बचत होते.

तर भाता हे कर्बोदकांचा एक चांगला स्रोत मानला जातो. त्यात प्रथिने, बी जीवनसत्त्वे, मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारखी इतर पोषक तत्वेही अल्प प्रमाणात असतात. योग्य प्रमाणात खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. तर उरलेल्या भातापासून हे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ झटपट पद्धतीने केले जातात. चला तर मग आजच्या लेखात आपण उरलेल्या भातापासून कोणते पदार्थ केले जातात त्यांची रेसिपी जाणून घेऊयात.

उरलेल्या भातापासून ‘हे’ 5 चविष्ट आणि झटपट पदार्थ बनवा

व्हेज फ्राईड राईस

एका कढईत थोडे तेल घेऊन त्यात गाजर, शिमला मिरची आणि वाटाणे त्यासोबतच तुमच्या आवडीच्या भाज्या परतवून घ्या. चवीनुसार मीठ, काळी मिरी आणि सोया सॉस टाकून काही मिनिटे शिजवा. त्यानंतर त्यात उरलेला भात मिक्स करा. अशा प्रकारे हा एक झटपट व्हेज फ्राईड राईस तयार आहे, जो भाज्या, फायबर, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा उत्तम समतोल पुरवतो.

लेमन राईस

एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या टाकून फोडणी द्या. हळद आणि उरलेला भात टाका, नंतर त्यावर ताज्या लिंबाचा रस टाका. हा एक हलका, चविष्ट आणि झटपट होणारा पदार्थ आहे, जो ऊर्जा आणि व्हिटॅमिन सी देतो.

राईस कटलेट

उरलेल्या भातामध्ये उकडलेले बटाटे, किसलेले गाजर, हिरवे वाटाणे, कोथिंबीर आणि सौम्य मसाले टाकून एकत्र करा आणि त्याच्या टिक्की बनवा. तव्यावर थोडं तेल टाकून तयार टिक्की दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. हा एक स्वादिष्ट नाश्ता आहे, ज्यामध्ये भाज्या आणि भात या दोन्हींमधील पोषक तत्वे मिळतात.

भात उत्तपम

उरलेला भातात थोडे दही आणि रवा एकत्र मिक्‍स करून हे मिश्रण वाटून घ्या. त्यात कांदे, टोमॅटो, शिमला मिरची आणि कोथिंबीर मिक्स करा.उत्तपमप्रमाणेच तव्यावर थोडे तेल टाकून शिजवा. हा एक पौष्टिक नाश्ता आहे, ज्यातून कर्बोदके, प्रथिने आणि वनस्पतीजन्य पोषक तत्वे मिळतात.

तांदळाची खीर

उरलेला भात दुधात मंद आचेवर शिजवा. त्यात वेलची, थोडी साखर किंवा गूळ टाका आणि वरून कापलेले बदाम व पिस्ते टाका. हा एक चविष्ट गोड पदार्थ आहे, जो सुक्या मेव्यामधून कॅल्शियम, ऊर्जा आणि अनेक आवश्यक पोषक तत्वे पुरवतो.

उरलेला भात किती काळ आणि कसा चांगला राहतो?

शिजवलेला उरलेला भात जास्त वेळ खोलीच्या तापमानावर ठेवू नये. तो थंड झाल्यावर एक ते दोन तासांच्या आत हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवणे उत्तम.

फ्रिजमध्ये ठेवलेला भात 24 ते 48 तासांच्या आत खाणे सर्वात सुरक्षित मानले जाते. पुन्हा गरम करण्यापूर्वी संभाव्य जीवाणूंचा धोका कमी करण्यासाठी भात पूर्णपणे गरम करा. तोच भात वारंवार गरम करणे टाळा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us