international Milk Day 2021 | ‘जागतिक दुग्ध दिन’, इम्युनिटी वाढवण्यासाठी आहारात सामील करा ‘हे’ दुग्धजन्य पदार्थ!

कोरोनाचा उद्रेक झपाट्याने वाढत आहे, तेव्हा याकाळात स्वत:ची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण या वेळी हा विषाणू लोकांच्या फुफ्फुसांवर वाईट रीतीने परिणाम करत आहे. यामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या, संक्रमण, पोटाच्या समस्या आणि इतर बर्‍याच समस्या उद्भवत आहेत.

international Milk Day 2021 | ‘जागतिक दुग्ध दिन’, इम्युनिटी वाढवण्यासाठी आहारात सामील करा ‘हे’ दुग्धजन्य पदार्थ!
दूध
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 12:48 PM

मुंबई : कोरोनाचा उद्रेक झपाट्याने वाढत आहे, तेव्हा याकाळात स्वत:ची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण या वेळी हा विषाणू लोकांच्या फुफ्फुसांवर वाईट रीतीने परिणाम करत आहे. यामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या, संक्रमण, पोटाच्या समस्या आणि इतर बर्‍याच समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत राखणे त्याहूनही अधिक महत्वाचे झाले आहे. म्हणूनच आजारपणाचा धोका कमी करणे, हात धुणे, आपल्या सभोवताली स्वच्छता राखणे अतिशय महत्त्वाचे आहे (international Milk Day 2021 know the health benefits of milk product to boost immunity).

या सगळ्यामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती बळकट करणे ही आपली प्रथम प्राथमिकता असली पाहिजे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत स्वतःचा बचाव करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे आपण दिवसभर काय खातो यावर लक्ष ठेवणे. हिरव्या भाज्या, शेंगांपासून ते हेल्दी दुग्धजन्य पदार्थांपर्यंत सर्व काही आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजे. दरम्यान, प्रतिकारशक्ती वाढीची गोष्ट येते तेव्हा दूध हा एक सर्वोत्कृष्ट पर्याय मानला जातो. शिवाय दुधाचे फायदे आणि उपयोग या संबधी माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून, 1 जूनला जागतिक दूग्ध दिन साजरा केल जातो. या निमित्ताने आपण जाणून घेऊया इम्युनिटी वाढवणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांबद्दल…

दूध

लहान मुलांपासून ते प्रौढ व्यक्तीपर्यंत सर्वांसाठी ‘दूध’ हा संपूर्ण आहार मानला जातो. त्यात व्हिटामिन ए, व्हिटामिन डी, झिंक, प्रथिने आणि इतर पोषक घटक असतात, जे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतात.

दही

तज्ञांच्या मते, प्रौढांमधील फ्लूसारख्या अनेक संक्रमणांवर एकदा प्रोबियोटिक्स असलेले दही सेवन करून नियंत्रित केले जाऊ शकते. दही लैक्टोबॅसिलसने समृद्ध आहे, हा असा प्रोबायोटिक आहे जो आपल्या शरीराला अनेक विषाणूंपासून लढायला मदत करतो आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवतो (international Milk Day 2021 know the health benefits of milk product to boost immunity).

चीज

फिनलंडमधील टूर्कु विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी केलेल्या नवीन अभ्यासानुसार, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चीज खूप प्रभावी ठरू शकते. या दुग्ध उत्पादनामध्ये प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात, जे वृद्ध आणि तरुणांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर म्हणून ओळखले जातात.

रोगप्रतिकारक प्रणालीतील पोषक तत्वांची भूमिका

दुध, चीज आणि दही यासह डेअरी खाद्यपदार्थांमध्ये जीवनसत्त्व अ आणि डी, झिंक आणि प्रथिने यासारखी आवश्यक पोषक तत्त्वे असतात, जी एक चांगली इम्युनिटी बूस्टर मानली जातात. तर, आपल्या शरीराची संरक्षण प्रणाली बळकट करण्यासाठी त्यांची काय भूमिका आहे हे जाणून घ्या…

– व्हिटामिन ए गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट आणि श्वसन प्रणालीच्या ऊतींना बळकटी देते.

– व्हिटामिन डी आपली गॅस्ट्रोइंटेस्टायनल प्रणाली सुरळीत ठेवण्यास मदत करते, तसेच आपल्या शरीरास फुफ्फुसांच्या संसर्गापासून वाचवते.

– आपल्या इम्युनिटीला बूस्ट करण्याबरोबरच झिंक त्वचेची काळजी घेण्यात देखील मदत करतो.

(टीप : कोणत्याही उपचारपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(international Milk Day 2021 know the health benefits of milk product to boost immunity)

हेही वाचा :

Menopause Diet Tips : मेनोपॉज दरम्यानच्या काळात महिलांनी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करावा

पुरुषांना त्यांच्यापेक्षा वयानं मोठ्या महिला, पार्टनर, पत्नी म्हणून का आवडतात? वाचा ही 9 कारणं!

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.