रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, वजनही घटवा; ‘हा’ काढा ठरतोय रामबाण उपाय

सध्याच्या कोरोनाच्या काळात जवळपास सर्वजण खाण्याकडे विशेष लक्ष देत आहेत.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, वजनही घटवा; 'हा' काढा ठरतोय रामबाण उपाय
तीळाचे खास पेय
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 8:40 AM

मुंबई : सध्याच्या कोरोनाच्या काळात जवळपास सर्वजण खाण्याकडे विशेष लक्ष देत आहेत. कारण सध्याच्या काळात कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आपण कोरोनापासून दूर राहू शकतो. मात्र, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण अधिकचा आहार घेत आहोत. ज्यामुळे अनेकांचे वजन वाढले आहेत. (This extract is beneficial for weight loss as well as boosting the immune system)

आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढेलच मात्र, तुमचे वाढलेले वजन कमी होण्यास देखील मदत होईल. यासाठी आपल्याला हिंग, काळी मिरी, लसूण, कढीपत्ता, तुळशीची पाने, आद्रक आणि गुळ लागणार आहे. सर्वात प्रथम दोन ग्लास पाणी घ्या आणि त्यात काळी मिरी आणि हिंग मिक्स करा. हे पाणी उकळण्यासाठी गॅसवर मंद आचेवर ठेवा. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता, आद्रक आणि लसूण घ्याला. हे पाणी ज्यावेळेला गरम करण्यासाठी ठेवता त्यावेळी प्लेटन हे पाणी झाकून ठेवा.

शेवटी यामध्ये गुळ घाला आणि वीस मिनिटे उसळूद्या. त्यानंतर हे पाणी ग्लासमध्ये घ्या आणि प्या. हे खास पेय पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते शिवाय वजनही कमी होण्यास मदत होते. कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुळवेल अत्यंत फायदेशी आहे. हे आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यास देखील मदत करते. गुळवेलमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत.

जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करतात. गुळवेलमुळे सांधेदुखी, त्वचेची अॅलर्जी, सर्दी आणि खोकला यासारख्या समस्यापासून मुक्त होण्यास मदत होते. गुळवेलचा काढा तयार करण्यासाठी आपल्याला 2 कप पाणी, गुळवेलच्या 2 लहान फांद्या, 2 दालचिनीच्या काड्या, 5 तुळशीची पाने, 8 पुदीनाची पाने, 2 चमचे मध, अर्धा चमचे हळद, 1 चमचे मिरपूड आणि आले आवश्यक आहे. सर्व प्रथम, मध्यम आचेवर पॅनमध्ये 2 कप पाणी घाला. आता त्यात गुळवेल घाला. नंतर सर्व साहित्य घाला.

अर्धा तास हे पाणी उकळी येऊ द्या. उकळल्यानंतर हा काढा थंड करून चाळून घ्या. दररोज दिवसातून एकवेळा तयारी गुळवेलचा काढा घेतला पाहिजे. हा काढा आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतली पाहिजे. हा काढा घेतल्यानंतर साधारण एकादा तास आपण काहीही खाल्ले नाही पाहिजे. जर आपल्याला शक्य असेल तर हा काढा आपण रात्री जेवनानंतर घेतला पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आयुर्वेदिक काढ्याच्या मदतीने आपण नैसर्गिक पद्धतीने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतात.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(This extract is beneficial for weight loss as well as boosting the immune system)

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.