IRCTC Nepal Tour : नेपाळ टूरसाठी IRCTC चे नवीन पॅकेज, पर्यटकांना हवाई प्रवासाची संधी

हे टूर पॅकेज 19 ते 24 जूनपर्यंत असणार आहे. नेपाळ दौऱ्यात प्रवाशांना लखनऊ ते काठमांडू आणि लखनऊ परत जाण्यासाठी थेट फ्लाइटची व्यवस्था करण्यात आली आहे. या लेखातून टूरचे भाडे, बुकिंगसह संपूर्ण तपशिल जाणून घेणार आहोत.

IRCTC Nepal Tour : नेपाळ टूरसाठी IRCTC चे नवीन पॅकेज, पर्यटकांना हवाई प्रवासाची संधी
आयआरसीटीसीकडून नेपाळ टूर पॅकेजImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 4:53 PM

मुंबई : आयआरसीटीसीकडून (IRCTC) वेळोवेळी देशांतर्गत विविध भागात असलेल्या पर्यटनस्थळांसाठी ट्रेनमधून टूर पॅकेजचे (Tour package) आयोजन करण्यात येत असते. परंतु आता देशाबाहेरील पर्यटनस्थळाला जाण्यासाठीही विविध पॅकजची सोय करण्यात येत आहे. आयआरसीटीसीकडून आंतरराष्ट्रीय हवाई टूर पॅकेज सुरू करण्यात आले आहेत. आयआरसीटीसी प्रादेशिक कार्यालय (Regional Office) लखनऊ ते नेपाळपर्यंत 6 दिवस आणि 5 रात्रीच्या विदेशी प्रवास टूर पॅकेजचे नियोजन करणार आहे. हे टूर पॅकेज या वर्षी 19 ते 24 जूनपर्यंत चालवले जाणार आहे. या दौऱ्यात प्रवाशांना लखनऊ ते काठमांडू आणि परत लखनऊला थेट विमानाने जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या टूर पॅकेजला चांगला प्रतिसाद मिळण्याची आशा आयआरसीटीसीकडून व्यक्त केली जात आहे.

प्रसिद्ध ठिकाणांना भेट

नेपाळ टूरमध्ये काठमांडूतील पशुपतिनाथ मंदिर, बौद्धनाथ स्तूप, दरबार स्क्वेअर, पोखरा येथील मनकामना मंदिर, विंध्यवासिनी मंदिर, गुप्तेश्वर महादेव गुंफा पहायला मिळणार आहे. या दौऱ्यात हिमालयातील टेकड्यांमधील सूर्योदयाचे दर्शन हे विशेष आकर्षण असणार आहे. हवाई प्रवास पॅकेजमध्ये विमान प्रवास, भारतीय भोजन व्यवस्था (नाश्ता आणि रात्रीचे जेवण) आयआरसीटीसीद्वारे हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली जाईल.

असे असेल भाडे

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून नेपाळच्या या हवाई दौऱ्यासाठी दोन व्यक्तींच्या एकत्र राहण्याच्या पॅकेजची किंमत 39 हजार प्रतिव्यक्ती आणि तीन व्यक्ती एकत्र राहण्यासाठी पॅकेजची किंमत प्रतिव्यक्ती 38 हजार 850 आहे. जर एखादी व्यक्ती हॉटेलच्या खोलीत एकटी राहिली तर त्याच्यासाठी पॅकेजची किंमत 48,500 रुपये असणार आहे. आयआरसीटीसी नॉर्दर्न झोनचे मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक अजित कुमार सिन्हा यांनी सांगितले की, या पॅकेजमध्ये मर्यादित जागा उपलब्ध आहे.

इतर पॅकेजेस देखील उपलब्ध

आयआरसीटीसीद्वारे लखनऊहून नेपाळची टूर आयोजित केली जात आहे. याशिवाय मे आणि जून महिन्यात काश्मीर, लेह-लडाख, शिमला-मनाली आणि धर्मशाला-डलहौसी या खोऱ्यांसाठी पॅकेजेस उपलब्ध आहेत.

अशी करा बुकिंग

इच्छुक व्यक्ती पर्यटन भवन, गोमतीनगर, लखनऊ येथील आयआरसीटीसी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात तसेच वेबसाइट www.irctctourism.com वरून ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे.

अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी संपर्क

नेपाळ: 8287930922

काश्मीर आणि लेह-लडाख : 8287930911

शिमला-मनाली आणि धर्मशाला-डलहौसी : 828790912

इतर बातम्या :

Amruta Fadnavis : ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से!, अमृता फडणवीसांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना डिवचलं

Pune Samir Bagsiraj : देवदूत बनून आला अन् चिमुकलीला मृत्यूच्या दाढेतून काढलं बाहेर! पुण्याच्या समीर बागसिराज यांचं सर्व स्तरातून कौतुक

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.