Blood Pressure High झाल्यावर गरम पाण्याने आंघोळ करावी की थंड पाण्याने?
High Blood Pressure: उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी थंड पाण्याने अंघोळ करावी की गरम पाण्याने असा प्रश्न नेहमीच सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया नेमकं काय करावं?

आजकाल उच्च रक्तदाब (हाय बीपी) ही एक सामान्य समस्या बनली आहे. कमी वयातही लोक रक्तदाब वाढल्याने त्रस्त होऊ लागले आहेत. यामागे आरोग्य तज्ज्ञ चुकीची जीवनशैली, जास्त तणाव, प्रोसेस्ड फूडचे जास्त सेवन आणि कमी व्यायाम यासारख्या कारणांना मोठी जबाबदारी मानतात. आता, रक्तदाब जास्त असताना प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असते. यादरम्यान अनेकदा लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की, हाय बीपी असताना गरम पाण्याने आंघोळ करावी की थंड पाण्याने? चला, जाणून घेऊया…
तज्ज्ञ काय सांगतात?
याबाबत प्रसिद्ध सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टने त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते सांगतात की, जर तुमचा रक्तदाब नेहमी जास्त असेल, तर तुम्ही नेहमी थंड पाण्याने आंघोळ करावी.
वाचा: झोपेची ही एक सवय हृदयविकाराचा धोका कमी करू शकते
थंड पाणी का फायदेशीर आहे?
-रक्ताभिसरण सुधारते
तज्ज्ञ सांगतात की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि नंतर पसरतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयावरचा दाब कमी होतो.
-रोगप्रतिकारक शक्ती वाढते
संशोधन सांगते की, दररोज थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
-स्नायूंच्या रिकव्हरीला मदत
थंड पाण्याने आंघोळ केल्याने स्नायूंची रिकव्हरी जलद होते.
-मानसिक शांती
याशिवाय थंड पाणी मेंदूला शांत करते, तणाव कमी करते आणि मूड चांगला बनवते. हे देखील रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. अशा प्रकारे थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्तदाब नियंत्रित होण्यासोबतच इतर अनेक फायदे मिळतात.
गरम पाणी का नाही?
गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीर निश्चितच रिलॅक्स होते, पण हाय बीपी असलेल्या लोकांसाठी हे योग्य मानले जात नाही. गरम पाणी रक्तवाहिन्यांना पसरवते, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव येऊ शकतो आणि रक्तदाब अचानक वाढू शकतो. त्यामुळे जर कोणाला हाय बीपी असेल तर जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे.
(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)
