वॅक्सिंग केल्यानंतर तुमची त्वचा होते कोरडी? मग या टिप्स नक्कीच ठरतील फायदेशीर
वॅक्सिंग मुळे अनावश्यक केस निघून जातात. वॅक्सिंग केल्यानंतर अनेकांचे हात आणि पाय कोरडे पडतात. हा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. या टिप्स फॉलो केल्यानंतर वॅक्सिंग नंतर येणारा त्वचेवर कोरडेपणा येणार नाही.

अनावश्यक केस काढण्याची पद्धत म्हणजे वॅक्सिंग. पण अनेकदा वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा कोरडी होते आणि ताणली जाणते. याचे कारण म्हणजे वॅक्सिंग करताना केसांसोबतच त्वचेच्या वरची डेड स्कीनही निघून जाते. त्यामुळे त्वचेची आद्रता कमी होते. वॅक्सिंग नंतर त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर ही समस्या आणखीन वाढू शकते. वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा मुलायम आणि निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य काळजी घेतल्याने केवळ कोरडेपणापासून आराम मिळत नाही तर तुमची त्वचा दीर्घकाळ मऊ राहण्यासही मदत होते. वॅक्सिंग केल्यानंतर तुम्ही तुमची त्वचा मऊ आणि हायड्रेट कशी ठेवू शकता ते जाणून घेऊ.
वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा मुलायम बनवण्यासाठी सोप्या टिप्स
मॉइश्चरायझर वापरा




वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर लगेच मॉइश्चरायझर लावा. त्यामुळे त्वचेची आद्रता टिकून राहण्यास मदत होते. यासाठी कोरफड, कोको बटर किंवा व्हिटॅमिन ई असलेले मॉश्चरायझर निवडा.
कोरफडीचा गर लावा
कोरफडीचा गर त्वचेला थंडपणा आणि आराम देतो. वॅक्सिंग नंतर कोरफडीचा गर लावल्याने त्वचेवर लालसरपणा, खाज येने आणि कोरडेपणा सारख्या समस्या कमी होतात तसेच त्वचा फ्रेश होते. त्यामुळे वॅक्सिंग नंतर नेहमी कोरफड जेलचा वापर करा.
थंड पाण्याने त्वचा धुवा
वॅक्सिंग केल्यानंतर लगेच आंघोळ करणे किंवा त्वचा गरम पाण्याने धुणे टाळा. त्या ऐवजी थंड किंवा कोमट पाणी वापरा जेणेकरून त्वचेला आराम मिळेल. याशिवाय थंड पाण्यामुळे त्वचेचा लालसरपणा, खाज सुटणे यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
हायड्रेशन ची काळजी घ्या
त्वचेची आद्रता राखण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या. जेणेकरून तुमचे शरीर हायड्रेट राहील. असे केल्याने तुमची त्वचा आतून हायड्रेट ठेवण्यास मदत होते.
खोबरेल तेल वापरा
खोबरेल तेल हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. वॅक्सिंग नंतर ते लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन त्वचा मऊ होते. खोबरेल तेल लावल्याने वॅक्सिंग नंतर जळजळ होण्यापासून आराम मिळू शकतो.
वॅक्सिंग केल्यानंतर या गोष्टींची घ्या काळजी
वॅक्सिंग नंतर लगेच त्वचेवर परफ्युम, डिओडोरंट किंवा कोणतेही रासायनिक उत्पादने लावू नका.
खूप गरम पाण्याने त्वचा धुणे टाळा. त्या ऐवजी थंड किंवा कोमट पाण्याचा वापर करा.
शक्य असल्यास वॅक्सिंग केल्यानंतर घट्ट कपडे घालू नका त्याऐवजी सैल कपडे घाला.