AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा उत्पादक शेतकरी धोरणात भरडला; आता बांगलादेशाच्या या निर्णयामुळे वाढली डोकेदुखी

Import duty on Onion : कांद्याचे निर्यात शुल्क 20 टक्के असतानाच आता बांगलादेशाने कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे कांद्याचे बाजार भाव कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.

कांदा उत्पादक शेतकरी धोरणात भरडला; आता बांगलादेशाच्या या निर्णयामुळे वाढली डोकेदुखी
| Updated on: Jan 17, 2025 | 12:21 PM
Share

कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून निर्यात शुल्काबाबत दिलासा मिळालेला नाही. कांद्याचे निर्यात शुल्क 20 टक्के असतानाच आता बांगलादेशाने कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे कांद्याचे बाजार भाव कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. आता केंद्र सरकारने तातडीने पावलं टाकण्याची मागणी केल्या जात आहे.

काय आहे निर्णय?

बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा कांदा आयात करणारा देश आहे. गेल्या वर्षात 20 टक्के तर त्यापूर्वी 17 टक्के कांद्याची निर्यात एकट्या बांगलादेशात झाली होती. आता बांगलादेशातील कांदा सुद्धा बाजारपेठेत येत आहे. या कांद्याला संरक्षण मिळावे आणि स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे यासाठी बांगलादेशाने कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. 17 जानेवारी म्हणजे आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

बांगलादेशाच्या निर्णयामुळे भारतीय कांदा उत्पादकांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. तेथील कांदा बाजारात येत असल्याने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी बांगलादेशाने हा निर्णय घेतला आहे. भारतीय कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी होत आहे. अन्यथा येणाऱ्या दिवसांमध्ये कांद्याचे बाजार भाव कोसळण्याची भीती व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे.

चाकण बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण

दरम्यान या निर्णयाचे पडसाद आता उमटत आहेत.चाकण बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण दिसून येत आहे. चार हजारांच्या जवळपास असणारे कांद्याचे दर आता २,२०० रुपयांच्या आत आले असल्याने शेतकरी अडचणी आला आहे , कांदा निर्यातीवरील केंद्र सरकारने २० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. त्यामुळे निर्यातीसाठी व्यापारी वर्गाकडून अनास्था व नवीन कांदा बाजारात आल्याने कांद्याची मोठ्या प्रमाणात अवाक वाढली आल्याने कांद्याचे दरात घसरण झाली आहे. भारतीय कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी होत आहे. अन्यथा येणाऱ्या दिवसांमध्ये कांद्याचे बाजार भाव कोसळण्याची भीती व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.