सुपारीच्या झाडाची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या 5 सोपे मार्ग
सुपारीच्या झाडाची पाने पिवळी पडून सुकत असतील, तर काळजी करू नका. जास्त पाणी, कमी प्रकाश आणि चुकीची माती ही त्याची प्रमुख कारणे असू शकतात. काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या सुपारीच्या झाडाला पुन्हा टवटवीत बनवू शकता.

घर सजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोकप्रिय वनस्पतींपैकी एक म्हणजे सुपारीचे झाड. ही वनस्पती आपल्या हिरव्या आणि लांब पानांमुळे घराला आकर्षक तर बनवतेच, पण घरातील हवाही शुद्ध करते. पण अनेकदा याची हिरवीगार पाने अचानक सुकू लागतात, पिवळी पडतात किंवा कडा तपकिरी होतात. वेळीच लक्ष न दिल्यास पूर्ण झाड कमकुवत होऊन मरू शकतं. पण काळजी करू नका! काही सोपे उपाय वापरून तुम्ही तुमच्या सुपारीच्या झाडाला पुन्हा एकदा हिरवेगार आणि टवटवीत बनवू शकता.
चला, सुपारीच्या पानांच्या सुकण्याची 5 मुख्य कारणे आणि त्यावरचे उपाय जाणून घेऊया.
पाणी (Overwatering) : सुपारीच्या झाडाची मुळे सडण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. या झाडाला जास्त पाणी आवडत नाही. त्यामुळे, जोपर्यंत वरची माती कोरडी वाटत नाही, तोपर्यंत पाणी देऊ नका. प्रत्येक वेळी पाणी देण्यापूर्वी बोटाने मातीतील ओलसरपणा तपासा. जर कुंडीमध्ये पाणी साठत असेल, तर पाण्याचा निचरा होण्यासाठी (drainage) कुंडीमध्ये योग्य छिद्र आहेत की नाही, हे तपासा.
सूर्यप्रकाश (Light Problem) : सुपारीच्या झाडाला ना खूप जास्त सूर्यप्रकाश लागतो, ना पूर्ण अंधार. हे झाड अप्रत्यक्ष (indirect) प्रकाशात उत्तम वाढते. जर तुम्ही त्याला थेट सूर्यप्रकाशात ठेवल्यास पाने जळू लागतात, आणि जर अंधाऱ्या खोलीत ठेवल्यास त्याची वाढ थांबून पाने पिवळी पडतात. या झाडाला खिडकीजवळ पडद्याच्या मागे किंवा जेथे नैसर्गिक पण सावलीचा प्रकाश येईल अशा ठिकाणी ठेवा.
हवा (Nursery) : सुपारीचे झाड उष्ण कटिबंधातील (tropical) असल्यामुळे त्याला हवेत जास्त आर्द्रता आवडते. जर तुम्ही त्याला एसी असलेल्या खोलीत किंवा खूप कोरड्या ठिकाणी ठेवाल, तर त्याची पाने तपकिरी होऊन सुकू लागतात. हे टाळण्यासाठी, दर दोन दिवसांनी त्याच्या पानांवर पाण्याची हलकी फवारणी (spray) करा. तुम्ही त्याच्या जवळ एका वाटीत पाणी ठेवूनही आजूबाजूला आर्द्रता टिकवून ठेवू शकता.
पोषक तत्व : जर झाडाला बराच काळ खत मिळाले नसेल, तर त्याची वाढ खुंटते आणि पाने कमकुवत होतात. यासाठी, दर महिन्याला एकदा वर्मीकंपोस्ट टी , शेणखत किंवा माशांच्या इमल्शनचे (fish emulsion) पातळ द्रावण द्या. जास्त खत दिल्यानेही नुकसान होऊ शकते, त्यामुळे खताची मात्रा कमी ठेवा.
माती किंवा कुंडी : सुपारीच्या झाडाला हलकी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी माती लागते. जर कुंडी खूप लहान झाली असेल किंवा माती खूप कठीण झाली असेल, तर झाडाला श्वास घेता येत नाही. यामुळे पाने सुकू लागतात. प्रत्येक 1.5 ते 2 वर्षांनी झाडाला थोड्या मोठ्या कुंडीत नवीन मातीत लावा. मातीत थोडी वाळू आणि नारळाच्या शेंड्याचा चुरा (कोकोपीट) मिसळल्यास मुळांना हवा मिळते.
या सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या सुपारीच्या झाडाला पुन्हा निरोगी आणि सुंदर बनवू शकता.
