जाणून घ्या… जान्हवी कपूरच्या निखळ त्वचा आणि केसांचे रहस्य !

जाणून घ्या... जान्हवी कपूरच्या निखळ त्वचा आणि केसांचे रहस्य !(Janhavi Kapoor's beauty secret)

जाणून घ्या... जान्हवी कपूरच्या निखळ त्वचा आणि केसांचे रहस्य !
जाणून घ्या जान्हवी कपूरच्या निखळ त्वचा आणि केसांचे रहस्य

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला नेहमी विना मेकअप पाहिले जाते. जान्हवी कपूरही आई श्रीदेवीप्रमाणेच सुंदर दिसते. जान्हवीचे सौंदर्य पाहून प्रत्येकाला तिच्या सौंदर्याचं रहस्य जाणून घेण्याची इच्छा असते. जान्हवी सौंदर्याचं रहस्य ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. नुकतेच एका मुलाखतीत जान्हवीने तिच्या सौंदर्याचे रहस्य उघड केले. जान्हवीने सांगितले की, ती तिच्या आईने सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करते.(Janhavi Kapoor’s beauty secret)

काय आहे जान्हवीच्या त्वचेचे रहस्य?

जान्हवीने सांगितले, ती चेहऱ्यासाठी फळांचा वापर करते. पपई, संत्री, टरबूज आदि फळांचा वापर जान्हवी चेहऱ्यावर करते. त्वचेच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी जान्हवी एवोकाडोचा वापर करते. यात अँटी एजिंग गुण असतात. जे त्वचेच्या वृद्धत्वाची समस्या दूर करतात. विटामीन सी युक्त फळांचा त्वचेवर वापर केल्याने त्वचेवरील डाग दूर होतात.

जाणून घ्या जान्हवीच्या चमकदार केसांचे रहस्य

जान्हवी तिच्या केसांसाठी नैसर्गिक उत्पादनांचा वापर करते. मेथीचे दाणे, आवळा आणि अंड्याचा उपयोग जान्हवी केसांसाठी करते. तसेच केसांना चमकदार आणि मुलायम ठेवण्यासाठी बिअरचा वापर करते. या सर्वांमुळे केसातील कोंड्याची समस्या दूर होते.(Janhavi Kapoor’s beauty secret)

 

इतर बातम्या

हाडांमधून आवाज येतोय… सावधान! आहारात या गोष्टींचा करा समावेश

‘प्रेम आणि निरागस मन’, प्रार्थना बेहेरेचं हे रुप पाहिलं का ?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI