AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सफर शिवरायांच्या इतिहासाची, गौरव एक्स्प्रेस ९ जूनला मुंबईतून रवाना, सीएसएमटी येथे CM दाखविणार झेंडा

आयआरसीटीसी आणि राज्य सरकारच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज सर्कीट भारत गौरव ट्रेन टूरची सुरुवात झाली आहे. या ट्रेनचा प्रवास ९ जून २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुरु होत आहे. या ट्रेनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झेंडा दाखविणार आहेत.

सफर शिवरायांच्या इतिहासाची, गौरव एक्स्प्रेस ९ जूनला मुंबईतून रवाना, सीएसएमटी येथे CM दाखविणार झेंडा
| Updated on: Jun 08, 2025 | 6:44 PM
Share

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक वर्धापन दिनानिमित्त भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ लिमिटेड ( आयआरसीटीसी ) छत्रपती शिवाजी महाराज सर्किट भारत गौरव ट्रेन टूर सुरु करण्यात आली आहे. या ट्रेनच्या प्रवाशांना ५ रात्री आणि ६ दिवस अशा प्रवासात महाराजाच्या जीवनातील ऐतिहासिक घडामोडी घडलेल्या पर्यटन स्थळांचा समावेश केला आहे. या गौरव एक्सप्रेस ट्रेनला १०० टक्के बुकींग मिळाले आहे. उद्या सोमवारी दि.९ जून २०२४ रोजी सकाळी ६ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ट्रेन सीएसएमटी फलाट क्रमांक १८ वरुन हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत.

पाच रात्री तर सहा दिवस प्रवास

या ट्रेनमधून सुरुवातीला 710 प्रवाशांनी बुकींग केलेले आहे. त्यातील 480 प्रवासी इकॉनॉमी (स्लीपर)मध्ये 190 प्रवासी कम्फर्ट (3AC) मध्ये आणि 40 प्रवासी सुपीरियर (2AC) मधून प्रवास करणार आहेत. भारत गौरव ट्रेन टुरची योजना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351व्या राज्याभिषेक वर्धापन दिनानिमित्ताने सुरु केली आहे. या ट्रेनचा प्रवास पाच रात्री तर सहा दिवस असा असणार आहे.

छत्रपती शिवारायांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी ही ट्रेन 9 जून, 2025 रोजी रायगडला पोहचार आहे. महाराष्ट्र सरकार आणि भारतीय रेल्वेने संयुक्तपणे ही ट्रेन सुरु केली आहे. या ट्रेनद्वारे प्रवाशांना रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, प्रतापगड किल्ला, पन्हाला किल्ला, लाल महल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी सारख्या ऐतिहासिक स्थळांना कव्हर करणार आहे. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहे. तसेच यातील प्रमुख आकर्षणांमध्ये भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिराला भेट मिळाली आहे.

पहिला मुक्काम राडगड

6 दिवसाची ही टुर CSMT मुंबई स्थानकातून प्रारंभ होणार आहे. पहिल्या दिवशी रेल्वे गाडी रेल्वेगाडी कोकण रेल्वे मार्गावर माणगांव रेल्वे स्थानकात पोहचेल. रायगड किल्ल्याजवळ रेल्वे लिंक आहे. त्यामुळे पहिला मुक्काम राडगड येथे होणार आहे. येथे रायगड किल्ला स्वराज्याची राजधानी असून येथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. येथे शिवाजी महाराज्याचे निधन झाले होते. त्यामुळे महाराजाची समाधानी देखील येथे आहे. त्यानंतर पुन्हा या ट्रेनमध्ये बसून पुण्याला ही ट्रेन रवाना होणार आहे.पर्यटक येथे रात्रीचे जेवण करुन पुण्यातील हॉटेलात मुक्काम करणार आहेत.

शाहीस्तेखान याची बोटे छाटली

दूसऱ्या दिवसी, पुण्यातील प्रमुख पर्यटन स्थळांना पाहाता येणार आहे. त्यात लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी पाहाता येणार आहे.लाल महालातच गनिमी काव्याने शिवाजी महाराजांनी धाड टाकत शाहीस्तेखान याची बोटे छाटली होती. लाल महिलाचे पुनर्निर्माण 1984 त्याच जागी करण्यात आले. येथे आता विविध चित्रांना पाहाता येणार आहे. संग्रहालयात अनेक वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत.पुण्यात कसबा गणपती मंदिराची स्थापना 1893 रोजी केली होती. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांची आई जिजाऊ माँ यांनी केली होती. येथील ऐतिहासिक थीम पार्कमध्ये मराठ्याच्या जीवनाची कहानी 3डीत दाखवली आहे.

शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला भेट

पुण्यात एका रात्रीत आराम केल्यानंतर तिसऱ्या दिवशी शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेता येणार आहे. येथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. दुपारी जेवल्यानंतर पर्यटक रात्री पुण्याहून परताण्याआधी 12 ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराची दर्शन घेऊ शकणार आहेत.

अफजल खानाचा कोथळा जेथे काढला

चौथ्या दिवशी पर्यटक सातारा स्थानकात उतरतील. येथील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या प्रतापगड किल्ल्याला पाहण्याचा रोमांच अनुभवता येणार आहे, येथेच प्रतापगडाच्या पायथ्याशी 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बिजापुरचा सरसेनापती अफजल खान यांच्यात तुंबळ युद्ध झाल्यामुळे प्रतापगडाला अत्यंत ऐतिहासिक महत्व आहे. दुपारी जेवण केल्यानंतर ट्रेनमधून टुरचे अंतिम स्थानक असलेल्या कोल्हापूरला निघतील.

पावन खिंडची इतिहास घडला

कोल्हापुरात हॉटेलात सकाळी अंघोळ आणि नाश्ता केल्यानंतर पर्यटक महालक्ष्मी मंदिरात अंबाबाईचे दर्शन घेतील नंतर पन्हाळा गडाकडे रवाना होतील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेनापती बाजी प्रभु देशपांडे यांनी येथे खिंडीत शत्रूला रोखले होते. त्यानंतर सायंकाळी उशीरा सहाव्या दिवशी प्रवासी मुंबईला पुन्हा परततील

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.