AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तोंडात मधमाशी गेल्याने करिश्माच्या पूर्व पतीचं निधन; घशात माशी किंवा मच्छर गेल्यावर लगेच करावेत हे उपाय

मोकळ्या जागेवर बोलताना तोंडात डास किंवा माशी शिरणं हे सामान्य आहे. परंतु असं झाल्यास त्वरित काय करावं हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात. अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरच्या घशात मधमाशी गेली होती.

तोंडात मधमाशी गेल्याने करिश्माच्या पूर्व पतीचं निधन; घशात माशी किंवा मच्छर गेल्यावर लगेच करावेत हे उपाय
Sunjay Kapoor and Karisma KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 16, 2025 | 9:10 AM
Share

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरचं गेल्या गुरुवारी इंग्लंडमध्ये निधन झालं. संजय 53 वर्षांचा होता. पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याची माहिती आधी समोर आली होती. परंतु, नंतर असंही म्हटलं गेलं की पोलो खेळताना अचानक त्याच्या तोंडात एक मधमाशी गेली होती. मधमाशीने संजयच्या घशात डंख मारला. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु काही वेळातच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं निधन झालं. या दु:ख बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.

मोकळ्या किंवा उघड्या जागी खेळताना, बोलताना डास किंवा माशी तोंडात जाणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. परंतु काही प्रकारांमध्ये ही घटना जीवघेणीही ठरू शकते. त्यामुळे माशी, डास किंवा मधमाशीसारखे कीटक अचानक तोंडात शिरल्यास त्वरित काय करावं हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात. या विषयावर प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आणि लेखक, जीवा आयुर्वेदचे संस्थापक आणि संचालक डॉ. प्रताप चौहान यांनी ‘एनडीटीव्ही’शी बोलताना काही उपाय सांगितले आहेत.

शांत राहा, घाबरू नका

डॉ. प्रताप चौहान यांनी सांगितलं की, सर्वप्रथम पॅनिक होऊ नका, घाबरू नका. घाबरल्यामुळे श्वासोच्छवास वेगाने होतो, त्यामुळे तोंडात गेलेला कीटक श्वासनलिकेत प्रवेश करू शकतो. अशा परिस्थितीत गुदमरण्याचा धोका वाढतो. फुफ्फुसांमध्ये सूज किंवा अडथळादेखील येऊ शकतो.

थुंकून तोंडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा

जर कीटक अजूनही तोंडात असेल तर तो लगेच थुंकून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.

कोमट पाण्याच्या गुळण्या किंवा जोरात खोकणे

जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की कीटक घशातच अडकलंय, तर तुम्ही जोरात खोकण्याचा प्रयत्न करा. कीटक बाहेर काढण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे. तुम्ही कोमट पाण्याच्या गुळण्यादेखील करू शकता.

डंख मारण्याचा धोका असले तर ताबडतोब डॉक्टरकडे जा

जर तुम्हाला तोंडात किंवा घशात सूज येत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा चक्कर येत असेल तर कदाचित तुम्हाला कीटकाने घशात चावा घेतला असू शकतो. अशा परिस्थितीत वेळ वाया न घालवता ताबडतोब डॉक्टरकडे जा.

उघड्यावर जेवताना किंवा बोलताना नेहमी काळजी घ्यावी, असा सल्ला डॉ. प्रताप यांनी दिला. त्याचप्रमाणे अशा परिस्थितीत घाबरू नका आणि आवश्यक ती पावलं त्वरित उचला. योग्य वेळी योग्य पावलं उचलून तुम्ही तुमचा किंवा इतरांचा जीव वाचवू शकता.

टिप- वरील लेखात फक्त सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. टीव्ही 9 या माहितीची जबाबदारी घेत नाही.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.