Kids Health: ‘हे’ 8 सुपर फूड्स लहान मुलांच्या आहारात समाविष्ट करा आणि मुलांची उंची वाढवा!

| Updated on: Jul 03, 2021 | 7:13 AM

लहान मुलांच्या आहाराची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे असते. पौष्टिक आहार न घेतल्यामुळे लहान मुलांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते.

Kids Health: हे 8 सुपर फूड्स लहान मुलांच्या आहारात समाविष्ट करा आणि मुलांची उंची वाढवा!
लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी आहार
Follow us on

मुंबई : लहान मुलांच्या आहाराची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे असते. पौष्टिक आहार न घेतल्यामुळे लहान मुलांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये विशेष करून उंची न वाढण्याची समस्या निर्माण होते. मुलांच्या शारीरिक विकासासाठी पौष्टिक आहार घेणे खूप महत्वाचे आहे. चला तर जाणून घेऊयात लहान मुलांची उंची वाढण्यासाठी त्यांच्या आहारात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. (8 super foods for kids to grow taller)

दूध – मुलांच्या आहारात दुधाचा समावेश करणे आवश्यक आहे. यात प्रथिने, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात. हे मुलांच्या आरोग्यासाठी आणि उंचीसाठी फायदेशीर आहे.

हिरव्या पालेभाज्या – हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. हिरव्या भाज्यांमध्ये आपण पालक, कोबी, मेथी आणि ब्रोकोली वापरू शकता. त्यामध्ये सूक्ष्म पोषक घटक असतात. यामुळे मुलांना कॅल्शियम मिळते.

सोयाबीन – सोयाबीनमध्ये प्रथिने भरपूर असतात. त्यामुळे हाडे मजबूत होतात. अमीनो अॅसिड व्यतिरिक्त यात इतरही अनेक पौष्टिक पदार्थ असतात. हे शरीरासाठी फायदेशीर आहे. आठवड्यातून दोनदा सोयाबीनचे सेवन केले पाहिजे.

अंडी – अंडीमध्ये प्रथिने, राइबोफ्लेविन, बायोटिन आणि लोह असतात. हे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी फायदेशीर आहे. मुलांच्या दैनंदिन आहारामध्ये अंडीचा समावेश करा.

दही – दही हे पोषक आणि प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि जस्त यांचा चांगला स्रोत आहे. हे मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर मुलांना दही खायला आवडत नसेल तर आपण पनीर देखील खाऊ शकता.

गाजर – गाजर बीटा कॅरोटीनने समृद्ध आहेत. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपण आपल्या रोजच्या आहारात कच्च्या गाजरांचा समावेश करू शकता. चांगल्या परिणामासाठी आपण हे कोशिंबीर किंवा रस स्वरूपात घेऊ शकता.

ओट्स – मुलांच्या आहारात ओट्सचा समावेश करणे चांगले आहे. ओट्स हे मेंदूसाठी उर्जेचे चांगले स्रोत आहे. ओट्समध्ये व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स आणि जस्त देखील असते. ज्यामुळे मुलांचा मेंदू चांगला होतो. आपण सफरचंद, केळी, ब्लूबेरी आणि बदाम यांचा ही मुलांचा आहारात समावेश करा.

ऑयली फिश – ओमेगा 3 फॅटी अॅसिड हे ऑयली फिशमध्ये जास्त असते. हे मेंदूच्या विकासासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सॉल्मन, मॅकेरल, फ्रेश ट्युना, ट्राउट, सार्डिन आणि हेरिंग सारख्या माशांमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड जास्त असते. मुलांच्या आहारात आठवड्यातून एकदा फिशचा समावेश केला पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(8 super foods for kids to grow taller)