आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल बाजरी-आवळ्याची चटणी, जाणून घ्या ‘या’ चटणीची खास रेसिपी….

बहुतेक लोकांना पावसाळ्यात मसालेदार चाट, समोसे आणि पकोडे खाणे आवडते. पण या गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. या पदार्थांमुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. जर, तुम्ही आम्लपित्त, गॅस, अपचन या समस्येने त्रस्त असाल, तर तुमच्या जेवणात बाजरी-आवळ्याची हिरवी चटणी नियमित खाल्ली पाहिजे.

आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल बाजरी-आवळ्याची चटणी, जाणून घ्या ‘या’ चटणीची खास रेसिपी....

मुंबई : बहुतेक लोकांना पावसाळ्यात मसालेदार चाट, समोसे आणि पकोडे खाणे आवडते. पण या गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. या पदार्थांमुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. जर, तुम्ही आम्लपित्त, गॅस, अपचन या समस्येने त्रस्त असाल, तर तुमच्या जेवणात बाजरी-आवळ्याची हिरवी चटणी नियमित खाल्ली पाहिजे.

ही चटणी खाण्यास चवदार तर आहेच, पण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्यात असलेला आवळा आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेच्या समस्या दूर ठेवतात. चला तर, बाजरी-आवळ्याची चटणी कशी बनवायची आणि त्याचा आहारात समावेश केल्याने कोणते फायदे होतात?, हे जाणून घेऊया…

बाजरी-आवळा चटणी

साहित्य

एक कप अंकुरलेले बाजरी

4 आवळा

अर्धा कप पाल्म शुगर

3 हिरव्या मिरच्या

अर्धा टिस्पून हळद

अर्धा टीस्पून बडीशेप

अर्धा टीस्पून ओवा

पाव टीस्पून हिंग

एक कप पाणी

ताजी पुदीना पाने

2 चमचे कोल्ड प्रेस मोहरीचे तेल

कृती :

प्रेशर कुकरमध्ये तेल, मोहरी, बडीशेप, मेथी दाणे, हिंग आणि हिरव्या मिरच्या घाला. आता त्यात अंकुरलेले बाजरी घालून चांगले शिजू द्या. यानंतर आवळा, मीठ आणि हळद घाला. मिश्रण मध्यम आचेवर शिजू द्या. आता त्यात थोडे पाणी, पुदिन्याची पाने घालून शिजवा. प्रेशर कुकर मध्यम आचेवर 15 मिनिटे शिजू द्या. कुकर उघडल्यावर त्यात पाल्म शुगर घाला. आता या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये टाकून बारीक करा. ही चटणी पुदिन्याच्या पानांनी सजवा आणि तुमच्या आवडत्या डिशसोबत सर्व्ह करा.

आवळ्याचे फायदे

आवळा हा एक सुपरफूड आहे जो, आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. या व्यतिरिक्त, ते पचन प्रणाली मजबूत करते. दुसरीकडे, बाजरी आरोग्यासाठी देखील चांगली आहे. त्यात पोटॅशियम, कॅल्शियम, जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात असतात. बाजरी प्रामुख्याने राजस्थान आणि हरियाणामध्ये खाल्ले जाते. हे शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते. आवळा आणि बाजरी दोन्ही पौष्टिक घटकांनी समृद्ध आहेत.

हेही वाचा :

Breakfast Recipes : सकस आहार घ्यायचाय? मग या 7 हेल्दी फ्रुट स्मूदी नक्की ट्राय करा

झटपट वजन कमी करण्यासाठी फॉलो करा लो-कार्ब डाएट, आरोग्यासाठीही ठरेल फायदेशीर!

Carom Seeds | ‘या’ आरोग्यदायी फायद्यांसाठी ‘ओव्या’चे नियमित सेवन ठरेल लाभदायी! जाणून घ्या याचे फायदे…

Side Effects Of Tea | चहाप्रेमी प्रेमी आहात? मग, सतत चहा पिण्याआधी जाणून घ्या त्याचे 5 गंभीर दुष्परिणाम!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI