AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Carom Seeds | ‘या’ आरोग्यदायी फायद्यांसाठी ‘ओव्या’चे नियमित सेवन ठरेल लाभदायी! जाणून घ्या याचे फायदे…

अजवाईन अर्थात ओवा हा भारतीय खाद्यपदार्थांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांपैकी एक आहे. त्याचा वापर डाळ, कढी, सलाड आणि लोणच्यामध्ये केला जातो. या बिया पाचन तंत्राशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करू शकतात.

Carom Seeds | ‘या’ आरोग्यदायी फायद्यांसाठी ‘ओव्या’चे नियमित सेवन ठरेल लाभदायी! जाणून घ्या याचे फायदे...
ओवा
| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 9:06 AM
Share

मुंबई : अजवाईन अर्थात ओवा हा भारतीय खाद्यपदार्थांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांपैकी एक आहे. त्याचा वापर डाळ, कढी, सलाड आणि लोणच्यामध्ये केला जातो. या बिया पाचन तंत्राशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करू शकतात. सुगंधासाठी देखील ओव्याचा वापर केला जातो. आयुर्वेदात ओव्याची महत्वाची भूमिका आहे, कारण तो अनेक रोगांवर उपचार करू शकतो. जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे…

पचनसंस्थेला आराम देतात

ओवा आपल्या शरीराचे पाचक अवयव जसे पोट, आतडे आणि अल्सर यांना अनेक समस्यांपासून दूर ठेवतो. ओव्याच्या बिया सहसा अपचन, गॅस आणि पित्त यावर उपचार करण्यास मदत करतात. आपण अर्धा चमचा ओवा चघळून किंवा पाण्यात मिसळून खाऊ शकता.

त्वचा आणि केसांचे फायदे

ओव्यामध्ये थायमॉल असते. हे जंतूंशी लढण्यास मदत करते. त्वचेच्या किरकोळ जळजळ, सूज काही मिनिटांत बरे करण्यासाठी, तुम्ही ओवा वापरू शकता. ओवा बारीक करून त्याची पेस्ट बनवून, आपण ती प्रभावित ठिकाणी लावू शकता. यासाठी ओवा पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि ती कमीतकमी 15 मिनिटे पुरळच्या खुणावर लावा आणि नंतर धुवा. केसांची अकाली पांढरे होण्याची समस्या टाळण्यासाठी ओव्याच्या बिया मदत करू शकतात. हे केस गळणे देखील बरे करू शकते. केस पांढरे होऊ नये यासाठी जर तुम्हाला अजवाईनचे सेवन करायचे असेल, तर तुम्ही दोन चमचे ओवा रात्रभर पाण्यात भिजवा आणि दुसऱ्या दिवशी पाणी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या.

इतर आरोग्यदायी फायदे

ओव्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे. तो आपली भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतो. भूक न लागण्यावर देखील तो मदत करू शकते. जर, तुम्हाला तुमची भूक वाढवायची असेल तर, तुम्ही ओवा बारीक करून त्यात गरम तूप मिसळून तो रोजच्या अन्नासोबत खाऊ शकता. यातील उच्च फायबर घटक आपल्या शरीरातून कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत करतात. त्यात असलेले मोनो आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राखण्यास मदत करतात. ओव्याच्या बिया सूज कमी करण्यात मदत करू शकतात, कारण त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. हे वेदना कमी करण्यास आणि संधिवाटाचा दाह कमी करण्यास देखील मदत करतात.

ओव्याचा वापर

ओवा अनेक पोषक घटकांनी समृध्द आहे. ओवा अन्नाचा सुगंध आणि चव वाढवतो. आपण अनेक प्रकारे ओवा वापरू शकता. डाळ, कढी किंवा तडका बनवताना तुम्ही अक्खा ओवा किंवा त्याची पावडर करून तो वापरू शकता. अपचनाच्या समस्येवर मात करण्यासाठी जिऱ्याऐवजी अजवाईनचा वापर केला जाऊ शकतो. तसेच, तो माऊथ फ्रेशनर म्हणून देखील वापरू शकता.

हेही वाचा :

चहाप्रेमी प्रेमी आहात? मग, सतत चहा पिण्याआधी जाणून घ्या त्याचे 5 गंभीर दुष्परिणाम!

Food : पौष्टीक आहार घेताना तुम्हीही ‘या’ चुका करत असाल, तर आजच बदल करा

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.