AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुगरनींनोsss! भाजी वाफेवर करावी की उकडून? योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या

भाज्या उकडल्याने त्या लवकर आणि चांगल्या प्रकारे शिजतात, तर काही लोक म्हणतात की वाफवल्याने त्यातील पोषक तत्वे टिकून राहतात. भाज्या शिजवण्याची योग्य पद्धत कोणती आहे तसेच त्यांचे फायदे आणि नुकसान कोणते आहेत ते जाणून घेऊयात

सुगरनींनोsss! भाजी वाफेवर करावी की उकडून? योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Mar 12, 2025 | 5:14 PM
Share

आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण अनेक प्रकारे शरीराची काळजी घेत असतो. तसेच आपल्या आहारात अनेक पौष्टिक पदार्थांचा समावेश करतो. हिरव्या भाज्या आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अन्न आपल्या शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर प्रदान करतात. याकरिता उत्तम आरोग्यासाठी चांगला आहार आवश्यक असतो. चांगला आहार म्हणजे पोषक तत्वांनी युक्त अन्न खाणे. पण तुम्हाला माहिती आहे का की भाज्या शिजवण्याची योग्य पद्धत कोणती आहे.? त्यातच त्यांच्या पौष्टिकतेवर ही परिणाम होतो? बऱ्याचदा अनेकजण याच संभ्रमात आहेत की भाज्या उकडुन की वाफवुन खावे.

आपल्यापैकी काही लोकांचा असा विश्वास आहे की भाज्या उकडुन त्या लवकर आणि चांगल्या प्रकारे शिजतात, तर काही लोक म्हणतात की भाज्या वाफवल्याने त्यामध्ये असलेले पोषक घटक सुरक्षित राहतात. शेवटी, कोणती पद्धत अधिक आरोग्यदायी आहे आणि कोणती तुमच्या आहारासाठी सर्वोत्तम ठरेल? आज या लेखात आम्ही तुम्हाला दोन्ही पद्धतींचे फायदे आणि नुकसान याबद्दल सांगणार आहोज जेणेकरून तुम्ही तुमच्या आरोग्यानुसार योग्य पद्धत निवडू शकाल.

भाज्या उकडुन खाण्याचे फायदे आणि नुकसान

फायदे

उकडलेल्या भाज्या लवकर आणि सहज शिजतात. तर काही उकडलेल्या भाज्यांच्या चवीत थोडासा बदल होतो, त्यामुळे काही भाज्या अधिक चविष्ट लागतात तसेच बटाटे, गाजर उकडल्याने ते मऊ होतात, ज्यामुळे यांचे सेवन केल्याने पचन देखील सहज होते.

नुकसान

भाज्या शिजवल्याने व्हिटॅमिन सी आणि बी-कॉम्प्लेक्स सारखे पोषक घटक कमी होऊ शकतात. जर भाज्या जास्त वेळ उकडल्यास त्यांचा पोत आणि चव दोन्ही बिघडू शकते. ज्यामुळे यां भाज्याचे सेवनाने शरीराला कोणतेच पोषण मिळत नाही.

भाज्या वाफवुन खाण्याचे फायदे व नुकसान

फायदे:

तुम्ही जर भाज्यांना वाफवले तर त्यातील 90 % पोषक घटक टिकून राहतात. तसेच भाज्यांचा नैसर्गिक पोत आणि रंग अबाधित राहतो. यासोबतच भाज्यांमध्ये जास्त तेल आणि मसाले न वापरताही भाज्या खाण्यास हेल्दी आणि चविष्ट लागतात.

नुकसान

आपल्या आहारामध्ये अशा काही भाज्या असतात ज्या वाफवुन खाऊ शकत नाही.कारण ते शिजण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे अशा भाज्या व्यवस्थित न शिजल्यास त्यांचे सेवन केल्यास तुमच्या शरीराला त्यांचा त्रास होऊ शकतो. तर काही लोकांना बिना मसाल्याशिवाय वाफवलेल्या भाज्या खाण्यास कमी चवदार लागतील.

कोणती पद्धत चांगली आहे?

जर तुम्हाला भाज्यांमधील पोषण टिकवून ठेवायचे असेल तर वाफवून घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्याचवेळी, जर तुम्हाला अन्न लवकर शिजवायचे असेल तर ते उकडुन खाणे योग्य ठरेल. याशिवाय, चांगल्या आरोग्यासाठी भाज्या हलक्या वाफवल्यानंतर त्यांना हल्का तडका देऊन खाल्ल्याने तुम्हाला चव आणि पोषण दोन्ही मिळू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार