AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Father Day 2025 : घरच्या घरी पप्पांसाठी बनवा 3 खास केक, जाणून घ्या रेसिपी

Father's Day 2025 साठी आपल्या वडिलांना घरच्या घरी खास केक बनवून सरप्राईज द्या. चॉकलेट केक, कप केक आणि एगलेस वनीला केक याच्या सोप्या रेसिपीज आम्ही तुम्हाला सांगितल्या आहेत. या रेसिपीज सहज घरच्या घरी करून आपल्या वडिलांचा दिवस खास बनवा.

Father Day 2025 : घरच्या घरी पप्पांसाठी बनवा 3 खास केक, जाणून घ्या रेसिपी
fathers day cake
| Edited By: | Updated on: Jun 27, 2025 | 11:53 PM
Share

Father’s Day 2025 साजरा करण्याची वेळ जवळ आली आहे. आपल्या आयुष्यात वडिलांचे योगदान अमूल्य असते. त्यांच्या कष्टाचा आणि प्रेमाचा सन्मान करण्यासाठी हा खास दिवस साजरा केला जातो. यावर्षी वडिलांसाठी खास गिफ्ट म्हणून त्यांच्या आवडीचा केक घरच्या घरी बनवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यासाठी तीन अतिशय सोप्या आणि स्वादिष्ट केक रेसिपी आम्ही घेऊन आलो आहोत.

1. चॉकलेट केक रेसिपी – Father’s Day Special Chocolate Cake Recipe

साहित्य :

  • कोको पावडर – 1/4 कप
  • डार्क चॉकलेट – 100 ग्रॅम
  • दूध – 1/2 कप
  • मैदा – 1 कप
  • व्हीपिंग क्रीम – 1 कप
  • वनीला एसेंस – 1 टीस्पून
  • बेकिंग सोडा – 1 टीस्पून
  • हार्ट शेप स्प्रिंकल्स
  • बटर – 2 टीस्पून
  • पिठी साखर – 1/2 कप

कृती : सर्वप्रथम मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ मिक्स करा. दुसऱ्या भांड्यात साखर व तेल एकत्र फेटा. त्यात वरील मैद्याचं मिश्रण टाका आणि त्यात वनीला एसेंस व दूध मिसळा. घोल नीट फेटून केक मोल्डमध्ये ओतून 180 डिग्री प्रीहीट ओव्हनमध्ये 25 मिनिटे बेक करा. दुसरीकडे व्हीपिंग क्रीममध्ये डार्क चॉकलेट, थोडं गरम दूध आणि बटर घालून चॉकलेट पेस्ट तयार करा. बेक झाल्यावर केक थंड करून त्यात क्रीम, साखर सिरप व डेकोरेशन करून सर्व्ह करा.

2. कप केक रेसिपी – Cup Cake Recipe

साहित्य :

  • मैदा – 1 कप
  • साखर – 1/2 कप
  • बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा – प्रत्येकी 2 ½ टीस्पून
  • मक्खन – 85 ग्रॅम
  • अंडी – 2
  • दही – 1/2 कप
  • दूध – 1/2 कप
  • वनीला एसेंस – 1 टीस्पून
  • मीठ

कृती : सर्व साहित्य एकत्र करून मिक्स करा. मग कप मध्ये घालून 180 डिग्री प्रीहीट ओव्हनमध्ये 25 मिनिटे बेक करा. थंड झाल्यावर क्रीमने डेकोरेशन करा आणि आपल्या पप्पांना सर्व्ह करा.

3. एगलेस वनीला केक रेसिपी – Eggless Vanilla Cake Recipe

साहित्य :

  • मैदा – 2 कप
  • बेकिंग पावडर – 2 ½ टीस्पून
  • मक्खन – 1 ½ कप
  • कॅस्टर शुगर – 1 ½ कप
  • पाणी – ½ कप
  • वनीला एसेंस – 1 टीस्पून
  • मीठ

कृती : मैदा आणि बेकिंग पावडर मिक्स करून त्यात मीठ, साखर, मक्खन, पाणी, वनीला एसेंस आणि दही टाका व नीट फेटा. तयार मिश्रण ग्रीस केलेल्या टिनमध्ये ओता. प्रेशर कुकरमध्ये 3-4 मिनिटे प्रीहीट करून त्यात केक ठेवून 30 मिनिटे लो फ्लेमवर बेक करा. थंड झाल्यावर सर्व्ह करा.

इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.