AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुंदर त्वचा पाहिजे, मग नक्की ‘या’ टिप्स फाॅलो करा

दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही

सुंदर त्वचा पाहिजे, मग नक्की 'या' टिप्स फाॅलो करा
दही
| Updated on: Mar 21, 2021 | 10:41 AM
Share

मुंबई : दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही. दही रक्तदाब, केस आणि हाडे यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. (Curd is beneficial for facial skin)

दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबंधी आणि सौंदर्यासंबंधित समस्यांवरदेखील दही खाणे हा उत्तम उपाय आहे. केसातील कोंड्यापासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? दह्याचे फेशियल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होतात. दह्याचे फेशियल तयार करायचे असेल तर शक्यतो दही हे घरीच तयार केलेले असावे.

-पाच चमचे दही

-दोन चमचे बदाम किंवा ऑलिव्ह तेल

-एक  ग्लास गरम पाणी

-एक सूती रुमाल

सर्वप्रथम, बदाम तेल दहीमध्ये मिसळा आणि चमच्याने चांगले मिक्स करा तयार केलेले मिश्रण आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 10 ते 15 मिनिटांसाठी मालिश करा. यानंतर, एक सूती रुमाल कोमट पाण्यात भिजवून चेहरा स्वच्छ करा. हे तुम्ही आठवड्यातून दोनदा केले तर चेहऱ्यावरील काळपट पणा, मुरूम, काळे डाग यांसारखे अनेक समस्या दूर होतील. आजकाल सर्वाना कंपनीचे डब्यातील पॅकबंद दहीच मिळते.

पूर्वीच्या काळी बऱ्याच घरांमध्ये छान काळ्या मातीच्या मडक्यात उकळून कोमट झालेल्या दुधात सायंकाळी विरजण घालून दही तयार केले जायचे. दही बनवण्याच्या पद्धती व त्याचा स्वाद यावरून दह्याचे पाच प्रकार पडतात. मंद, गोड, आंबट-गोड, आंबट व अत्यंत आंबट असे हे पाच प्रकार. या प्रत्येक प्रकारानुसार, आजारानुसार व ऋतूनुसार दही सेवन केल्यास दह्याचे फार चांगले फायदे मिळतात. मात्र चुकीच्या पद्धतीने दही सेवन केल्यास नको असलेल्या आजारांनाही निमंत्रण मिळते. शरद, ग्रीष्म व वसंत ऋतूमध्ये दही खाणे हितकारक नसते. यामुळे कफ वाढून सर्दी, खोकला मागे लागतो.

संबंधित बातम्या : 

(Curd is beneficial for facial skin)

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....