AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिगारेट, दारूपासून चार हात दूर शिवाय हेल्दी जीवनशैली फाॅलो, तरीही केकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू कसा? वाचा महत्वाचे!

कोलकाता येथील एका कॉलेजमध्ये केकेचा जबरदस्त लाईव्ह परफॉर्मन्स चालू होता. सर्वजण केकेच्या सुपरहिट गाण्यांवर डान्स करत होते. मात्र, तिथे असणाऱ्यांना काय माहिती होते, की हा केकेचा शेवटचा परफॉर्मन्स आहे. प्राथमिक तपासात केके यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे. केकेने तंदुरुस्त राहण्यासाठी एक खास डाएट प्लॅनच तयार केला होता.

सिगारेट, दारूपासून चार हात दूर शिवाय हेल्दी जीवनशैली फाॅलो, तरीही केकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू कसा? वाचा महत्वाचे!
Image Credit source: utlookindia.com
| Updated on: Jun 01, 2022 | 4:01 PM
Share

मुंबई : प्रसिध्द गायक केके (KK) यांच्या अशा जाण्याने प्रत्येकजणच हैराण आहे. केकेचा मृत्यू सर्वांनाच धक्कादायक आणि अस्वस्थ करणाराच आहे. निरोगी जीवनशैली जगणाऱ्या केके यांचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack) मृत्यू झाला असा विश्वास केकेच्या जवळच्या व्यक्तींना बसत नाहीयेत. कारण केके हे अत्यंत हेल्दी लाइफस्टाईल जगत होते. इतकेच काय तर मसालेदार, तेलकट, तूपकट आणि बाहेरील खाद्यपदार्थांपासून केके शक्यतो दूरच असायचे. केकेच्या मृत्यूनंतर प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. व्यायाम (Exercise) केके न चुकता करत असत. मग इतके सर्व करूनही केके यांना हृदयविकाराच्या झटका कसा येऊ शकतो, असा प्रश्न केकेच्या फॅन्सला पडला आहे.

तेलकट आणि मसालेदार पदार्थांपासून दूरच

कोलकाता येथील एका कॉलेजमध्ये केके यांचा जबरदस्त लाईव्ह परफॉर्मन्स चालू होता. सर्वजण केकेच्या सुपरहिट गाण्यांवर डान्स करत होते. मात्र, तिथे असणाऱ्यांना काय माहिती होते, की हा केके यांचा शेवटचा परफॉर्मन्स आहे. प्राथमिक तपासात केके यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे. केके यांनी तंदुरुस्त राहण्यासाठी एक खास डाएट प्लॅनच तयार केला होता. तेलकट आणि मसालेदार पदार्थ ते कधीही खात नसत. फक्त प्रवासा दरम्यान फक्त चीट डे करायचे. तसेच दारू किंवा धूम्रपान हे देखील केके कधीच करत नव्हते. मधुमेह किंवा बीपी वगैरे अशा कुठल्याही आरोग्य समस्या केके यांना कधीच नव्हत्या.

जबरदस्त लाईव्ह परफॉर्मन्स ठरला शेवटचा

केके यांनी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी आणि बंगाली यासह इतर भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत. केके यांच्या अशा अचानक जाण्याचे अनेक तर्कविर्तक वर्तवले जात आहेत. केकेला कोरोनाची लागण तर झाली नाही ना असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता, मात्र, केकेच्या जवळच्या मित्राने सांगितले की, केकेला कोरोनाची लागण नव्हती झाली. असेही सांगितले जात आहे की, कोलकातामधील परफॉर्मन्स वेळी काही वेळ एअर कंडिशनिंग यंत्रणा व्यवस्थित सुरु होती. मात्र, काही वेळानंतर बंद करण्यात आली होती आणि केकेने एसी चालू करायला सांगितले होते असे चाहत्याचे म्हणणे आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.