Health Tips : हंगामी संक्रमण टाळण्यासाठी ‘हे’ 5 हर्बल पेय प्या आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करा!

देशामध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असेल तरी देखील आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकार कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची तयारी करत असताना, आपल्या आरोग्याबद्दल देखील आपण सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

Health Tips : हंगामी संक्रमण टाळण्यासाठी 'हे' 5 हर्बल पेय प्या आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करा!
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खास पेय

मुंबई : देशामध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असेल तरी देखील आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकार कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची तयारी करत असताना, आपल्या आरोग्याबद्दल देखील आपण सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. खाण्याबरोबरच पेयांकडेही विशेष लक्ष द्या, जे आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. त्यामध्येही आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करणारे पेय आहारात घेतले पाहिजेत. (Drink herbal drinks and boost the immune system)

अश्वगंधा

अश्वगंधा एक औषधी वनस्पती आहे जी विविध आजारांपासून मुक्त होण्यास मदत करते. आयुर्वेदात त्याचा उपयोग विविध रोगांच्या उपचारात केला जातो. यात पेप्टाइड्स, अमीनो अॅसिडस् आणि लिपिड्ससारखे गुणधर्म आहेत जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. अश्वगंधा नियमितपणे घेतल्याने तणाव, चिंता, नैराश्य आणि कमी झोपेची समस्या दूर होते.

ब्राह्मी

अश्वगंधा प्रमाणेच, चिंता आणि मानसिक आरोग्याच्या समस्येवर उपचार करण्यासाठी ब्राह्मीचा उपयोग आयुर्वेदात केला जातो. त्यामध्ये उपस्थित औषधी गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी वापरले जातात. यामुळे ताण आणि नैराश्य दूर होते. ब्राह्मीमध्ये उपस्थित अँटी-ऑक्सिडंटमुळे मधुमेह, कर्करोग यासारख्या धोकादायक आजारांचा धोका कमी होतो.

सब्जा

सब्जा एक स्फूर्तिदायक पेय आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सब्जामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडस्, जीवनसत्त्वे अ, बी, ई, के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह भरपूर असतात. या बियांमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिनोल्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास तसेच रॅडिकल्सचा धोका कमी करण्यास मदत करतात.

बडीशेप

बडीशेप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक प्रकारचे संक्रमण कमी करण्यासाठी बडीशेप मदत करते. बडीशेपचे पेय पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि बीटा कॅरोटीन समृद्ध असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करतात.

खसखस

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट राहण्यासाठी खसखसचे पेय ​​प्या. खसखस रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. खसखस अँटिऑक्सिडेंट समृद्ध असते. जे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करतात. खसखस हे जस्त समृद्ध आहे, जे संक्रमणास लढण्यास मदत करते.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya | पपईचे अतिसेवन शरीरासाठी घातक, अनेक आजारांना मिळेल निमंत्रण!

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

(Drink herbal drinks and boost the immune system)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI