…आणि म्हणून या रेसीपीचे नाव ‘चिकन 65’असे पडले, जाणून घ्या मजेदार कथा आणि सोपी रेसिपी

तुम्हीही चिकन 65 चे नाव नक्कीच ऐकले असेल. मात्र या नावा मागील खरी गोष्ट माहिती नाही. तर आज आपण या लेखातून जाणून घेऊ चिकन 65 या नावा मागची गंमतीशीर कहाणी आणि त्या सोबतच घरी सोप्प्या पद्धतीने बनवण्याची रेसिपी देखील शिकू.

...आणि म्हणून या रेसीपीचे नाव ‘चिकन 65’असे पडले, जाणून घ्या मजेदार कथा आणि सोपी रेसिपी
Image Credit source: (kahajaun/Instagram)
| Edited By: | Updated on: Mar 06, 2025 | 1:15 AM

चिकन म्हटले की लहाना पासून ते मोठ्यांपर्यंतच्या तोंडाला पाणी सुटत. अंशातच ही एक अशी डिश आहे जी आपल्या तिखट, कुरकुरीत आणि मसालेदार चवेमुळे खवय्यांची लाडकी बनली आहे. जर तुम्हीही मांसाहाराचे शौकीन असाल तर चिकन 65 चे नाव नक्कीच ऐकले असेल. या डीश केवळ भारतातच नाही तर जग भरातील लोक मोठ्या उत्साहाने खातात.

चिकन 65 ही स्वस्त आणि मस्त डीश आहे. मात्र अनेक लोकांना या नावा मागील खरी गोष्ट माहिती नाही. आज आपण चिकन 65 या नावा मागची गंमतीशीर कहाणी जाणून घेऊ आणि त्या सोबतच घरी सोप्प्या पद्धतीने बनवण्याची रेसिपी देखील शिकू.

चिकन “65” नावाचे नेमकं रहस्य काय?

चिकन 65 हे नाव कसे पडले, यावर अनेक थिअरी आहेत. चला, त्यातील काही लोकप्रिय गोष्टी जाणून घेऊया.

१. चिकन ६५ ही डीश पहिल्यांदा 1965 मध्ये तयार झाली होती-

सर्वात प्रसिद्ध थिअरीनुसार, ही डिश सर्वप्रथम 1965 मध्ये चेन्नईच्या बुहारी नावाच्या हॉटेलमध्ये (Buhari Hotel) बनवण्यात आली होती. विशेषतः हा पदार्थ भारतीय लष्कराच्या सैनिकांसाठी पहिल्यांदा बनवण्यात आला होता. आणि म्हणूनच, त्या वर्षाच्या सन्मानार्थ याला “चिकन 65” असे नाव देण्यात आले.

२. 65 प्रकारचे मसाले वापरले होते-

काही लोकांचे मत आहे की ही डिश बनवताना यात 65 प्रकारचे वेगवेगळे मसाले वापरण्यात आले होते. त्यामुळेच याला चिकन 65 असे नाव दिले गेले. मात्र, ही थिअरी फारशी प्रसिद्ध नाही कारण आजच्या काळात चिकन 65 बनवताना एवढे मसाले वापरले जात नाहीत.

३. मेन्यूमधील 65वा क्रमांक

अजून एका कथेप्रमाणे, चेन्नईच्या बुहारी हॉटेलच्या मेन्यूमध्ये ही डीश 65व्या क्रमांकावर होती, त्यामुळे तिला “चिकन 65” असे नाव मिळाले.

४.65 दिवसांचे चिकन वापरण्यात आले

काही जणांचा असा ही विश्वास आहे की या डिशसाठी वापरण्यात आलेले चिकन 65 दिवसांचे होते. म्हणून, त्याला चिकन 65 असे नाव दिले गेले.

चिकन 65 झटपट घरी कसे बनवायचे?

साहित्य:

  • .500 ग्रॅम बोनलेस चिकन (छोट्या तुकड्यांमध्ये कापलेले)
  • .2 टेबलस्पून दही
  • .1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
  • .1 टीस्पून लाल तिखट
  • .½ टीस्पून हळद
  • .1 टीस्पून धनिया पावडर
  • .½ टीस्पून गरम मसाला
  • .1 टीस्पून मिरी पावडर
  • .1 टीस्पून जिरे पावडर
  • .2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
  • .2 टेबलस्पून मैदा
  • .1 टीस्पून लिंबाचा रस
  • .10-12 कढीपत्त्याची पाने
  • .2-3 हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
  • .चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

बनवण्याची प्रक्रिया :

१. चिकनचे तुकडे स्वच्छ धुऊन एका मोठ्या भांड्यात घ्या.

२. त्यामध्ये दही, आलं-लसुण पेस्ट, लाल तिखट, हळद, धनिया पावडर, गरम मसाला, मिरी पावडर, जिरे पावडर, लिंबाचा रस आणि मीठ घालून व्यवस्थित मिसळा.

३. आता त्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लोअर घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा,

४. हे मिश्रण किमान 30 मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा, जेणेकरून मसाले आतपर्यंत शोषले जातील.

५. एका कढईत तेल गरम करा आणि त्यात मॅरिनेट केलेले चिकन मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळा.

६. तळलेले चिकन टिशू पेपरवर काढा, जेणेकरून जास्तीचे तेल निघून जाईल.

७. दुसऱ्या एका पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करा आणि त्यात कढीपत्ता व हिरव्या मिरच्या टाका.

८. आता तळलेले चिकन त्यात घालून 1-2 मिनिटे परतवा, जेणेकरून तडका चांगला लागेल.

९. गरमागरम चिकन 65 धनियाच्या पानांनी सजवून सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा!

चिकन 65 ही केवळ एक डिश नसून, त्याच्या नावामागे अनेक मजेदार कथा आहेत. यातील कोणती कथा खरी आहे हे अजूनही स्पष्ट नाही, पण त्याचा स्वाद मात्र नक्कीच अप्रतिम आहे! जर तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल, तर ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा आणि तिखट, क्रिस्पी चिकन 65 चा आनंद घ्या!