दोन हिरव्या भाज्या आणि दोन फळे आहारात समाविष्ट करा आणि निरोगी आयुष्य जगा!

निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी निरोगी आहार अत्यंत महत्वाचा आहे. आपला आहार नेहमी जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असावा जो आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवतो.

दोन हिरव्या भाज्या आणि दोन फळे आहारात समाविष्ट करा आणि निरोगी आयुष्य जगा!
आहार

मुंबई : निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी निरोगी आहार अत्यंत महत्वाचा आहे. आपला आहार नेहमी जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असावा. जो आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवतो. मात्र, बहुतेक लोकांना असे वाटते की, दीर्घायुष्य जगण्यासाठी मांस आणि अंडी खाणे आवश्यक आहे. असे काही नसून आपण दिवसभरामध्ये दोन हिरव्या भाज्या आणि दोन फळे आपल्या आहारात समावेश केला तर आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. (Eat two vegetables and two fruits and live a healthy life)

साधारण आपण दिवसातून दोन वेळा जेवन करतो आणि एक वेळ नाश्ता करतो. आपण एक वेळच्या जेवनामध्ये किमान एक हिरवीपाले भाजी घेतली पाहिजे. त्यानंतर जेवताना किंवा जेवन झाल्यावर आपण एक फळ खाल्ले पाहिजेत. म्हणजे दोन वेळेचा जेवनामध्ये एक-एक हिरव्या भाज्या आणि फळ असे करून आपण दिवसभरातमध्ये किमान दोन पालेभाज्या आणि दोन वेगवेगळे फळ खाल्ले पाहिजे. आपण असे केल्याने निरोगी आणि दीर्घायुष्य जगू शकतो.

सकाळचा नाश्ता ते दुपारच्या जेवणादरम्यान फळं, नारळाचे पाणी, रस, ताक असे काहीतरी सेवन करा. दुपारच्या जेवणात प्रथम सलाड खा. त्यानंतर डाळ, 2 चपात्या आणि हिरव्या भाज्या खा. चपाती बार्ली, हरभरा आणि गव्हाचे पीठ यांच्या मिश्रणाची असावी. चपातीसाठी मका, गहू, बाजरी हे त्या-त्या हंगामाप्रमाणे बदला. दुपारच्या जेवणानंतर चहा किंवा ग्रीन टी घ्या. रात्रीचे जेवण हलके असावे. त्यात हिरव्या भाज्या आणि चपाती यांचा समावेश करा.

केळीचा ही आपल्या आहारात समावेश करा. केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. हे सर्व वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतात. केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत. केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Eat two vegetables and two fruits and live a healthy life)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI