AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीमध्ये जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खात आहात? तर ‘ही’ खास बातमी तुमच्यासाठीच, वाचा सविस्तर!

सणासुदीमध्ये पहिला परिणाम आपल्या रोजच्या जेवणावर होतो. दररोज तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याबाबत किंवा डाएटिंगबाबत सर्तक असाल पण सणासुदीच्या वेळी डाएटिंगला ब्रेक लागतो. इतके स्वादिष्ट आणि विविध प्रकारचे पदार्थ आपल्या समोर असतात की आपण ते खाल्ल्याशिवाय राहत नाहीत.

दिवाळीमध्ये जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खात आहात? तर 'ही' खास बातमी तुमच्यासाठीच, वाचा सविस्तर!
आहार
| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 1:10 PM
Share

मुंबई : सणासुदीमध्ये पहिला परिणाम आपल्या रोजच्या जेवणावर होतो. दररोज तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याबाबत किंवा डाएटिंगबाबत सर्तक असाल पण सणासुदीच्या वेळी डाएटिंगला ब्रेक लागतो. इतके स्वादिष्ट आणि विविध प्रकारचे पदार्थ आपल्या समोर असतात की आपण ते खाल्ल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवू लागतात. सुंदर कपडे घालून दिवाळी साजरी करा, पण तुमच्या खाण्यापिण्यावर थोडे नियंत्रण ठेवा.

गॅस आणि ब्लॉटिंग

जास्त खाल्ल्याने शरीरात गॅसची समस्या होऊ शकते. सण-उत्सवांचे जेवण हे खूप तेलकट-मसालेदार असते. तेल आणि मसाले जास्त खाल्ल्याने पोटात गॅस होऊ शकतो. काही वेळा जड अन्न आतड्यात अनेक दिवस अडकून राहते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते.

जळजळची समस्या

सणासुदीच्या काळात भरपूर खाल्ल्याने वजन वाढल्याची तक्रार लोक अनेकदा करतात. हे वजन खरं तर शरीराच्या आत होणारी जळजळ असते. म्हणजेच तुमचे शरीर आतून फुगते. तुम्हाला अनेकदा असे वाटले असेल की सकाळी उठल्यावर पोट फुगते. असे घडते कारण शरीराच्या आत जळजळ होत आहे.

अपचन आणि बद्धकोष्ठता

जास्त खाल्ल्याने अपचन आणि बद्धकोष्ठता दोन्ही होऊ शकतात. जास्त तेल आणि मसालेदार अन्न पोटात सहज पचत नाही. यासोबतच मैदा आणि कार्ब्स असलेल्या अनेक गोष्टी आपल्या आतड्यांमध्ये चिकटून राहतात आणि बद्धकोष्ठता निर्माण होते. या दोन्ही समस्या अति खाण्यामुळे होतात. संतुलित आणि काळजीपूर्वक खाल्ल्यास या सर्व समस्या टाळता येतात.

संबंधित बातम्या : 

एकदा उकळवलेले दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? होऊ शकते मोठे नुकसान!

Weather change sickness । बदलत्या हवामानात चुकूनही करु नका या 5 चुका, आजारी पडाल

(Eating oily and spicy foods is dangerous to health)

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप