Health Care : ‘ग्रीन टी’ पिणे आरोग्यासाठी फायदेशीर, पण अति सेवन नकोच!

ग्रीन टी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ग्रीन टीमध्ये अॅंटी-ऑक्सीडंट आणि पॉलीफेनॉल घटक असतात.

Health Care : 'ग्रीन टी' पिणे आरोग्यासाठी फायदेशीर, पण अति सेवन नकोच!
ग्रीन टी

मुंबई : ग्रीन टी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ग्रीन टीमध्ये अॅंटी-ऑक्सीडंट आणि पॉलीफेनॉल घटक असतात. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच ग्रीन टी ही तुमच्या त्वचेसाठीही उत्तम मानली जाते. मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वापरणे चुकीचे असते. आपल्याला माहिती आहे की, ग्रीन टी पिल्यामुळे आपले वजन कमी होते. (Excessive consumption of green tea is dangerous)

बरेच लोक वजन कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात ग्रीन टीचे सेवन करतात आणि हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. दिवसातून 1 ते 3 कपापेक्षा जास्त ग्रीन टी सेवन करू नये. असे केल्याने शरीराला इजा होऊ शकते आणि ती व्यक्ती शारीरिक दुर्बलतेचा बळी पडू शकते. ग्रीन टीचे सेवन करण्यापूर्वी किंवा केल्यानंतर किमान एक तासाच्या अंतरानेच काहीही पदार्थ खावेत.

ग्रीन टी तुम्ही अतिप्रमाणात घेतली तर ती शरीरासाठी हानिकारक ठरते. एका अभ्यासानुसार, वजन कमी करण्यासाठी दिवसातून केवळ 2 वेळाच ग्रीन टी पिणे योग्य आहे. तसेच यापेक्षा जास्त ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. ग्रीन टी तयार करण्यासाठी पाण्याला खूप जास्त गरम करु नका. त्यामुळे त्यात आवश्यक जीवनसत्त्व नष्ट होतात.

चांगल्या परिणामांसाठी तुम्ही पाणी गरम करुन 10 मिनीटे तसेच ठेवा. त्यानंतर ग्रीन टीचे पॅकेट कपात घेऊन त्यावर गरम पाणी टाका आणि 1 मिनीटे तसेच ठेवा. ग्रीन टी आणि पाणी एकत्रित झाल्यानंतर प्या. पण ग्रीन टी आणि ब्लॅक टी तुम्ही अतिप्रमाणात घेतली तर ती शरीरासाठी हानिकारक ठरते.

संबंधित बातम्या : 

Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!

Hair Care | केसांची निगा राखण्यासाठी सोनम कपूरच्या टिप्स, तुम्हीही एकदा ट्राय करून पाहा!

(Excessive consumption of green tea is dangerous)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI