AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Food : घरच्या-घरी तयार करा खास मलाई कोफ्ता, जाणून घ्या रेसिपी!

तुम्हाला मलईदार आणि मसालेदार ग्रेव्ही आवडते? तर तुम्ही ही सोपी मलाई कोफ्ता घरी नक्की करू पाहा. पनीर, फ्रेश क्रीम, आले, लसूण, टोमॅटो आणि कांदा वापरून बनवलेली ही रेसिपी चवदार होते. विशेष म्हणजे ही खास डिश तयार करण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो.

Food : घरच्या-घरी तयार करा खास मलाई कोफ्ता, जाणून घ्या रेसिपी!
मलाई कोफ्ता
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 9:25 AM
Share

मुंबई : तुम्हाला मलईदार आणि मसालेदार ग्रेव्ही आवडते? तर तुम्ही ही सोपी मलाई कोफ्ता घरी नक्की करू पाहा. पनीर, फ्रेश क्रीम, आले, लसूण, टोमॅटो आणि कांदा वापरून बनवलेली ही रेसिपी चवदार होते. विशेष म्हणजे ही खास डिश तयार करण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो. चला तर मग जाणून घेऊयात या खास डिशची रेसिपी.

मलाई कोफ्त्याचे साहित्य

100 ग्रॅम पनीर

1 टीस्पून हिरवी वेलची

साखर

1 टीस्पून कॉर्न फ्लोअर

5 ग्रॅम बदाम

हळद

1 कप काजू पेस्ट

आवश्यकतेनुसार मीठ

2 चमचे फ्रेश क्रीम

40 ग्रॅम खवा

1 टीस्पून मैदा

5 ग्रॅम काजू

5 ग्रॅम मनुका

200 मिली तेल

1 टीस्पून बटर

1 टीस्पून हिरवी वेलची

1 कप कांदा

स्टेप 1-

ही मलाई कोफ्ता रेसिपी बनवण्यासाठी एक वाडगा घ्या आणि त्यात पनीर, हिरवी वेलची पावडर आणि साखर मिक्स करा. या मिश्रणात कॉर्नफ्लोअर घालून पीठ मळून घ्या.

स्टेप 2-

एक लहान वाडगा घ्या आणि त्यात पनीर, काजू आणि बदाम हळद मिसळा. चांगले मिसळा आणि दोन भागांमध्ये विभागून घ्या. पीठाचे दोन भाग करा आणि एक भाग अर्धा रोल करा आणि खुला भाग झाकण्यासाठी दाबा आणि पुन्हा गोळे बनवा.

स्टेप 3-

नंतर पॅन घ्या आणि त्यात तेल गरम करा. ही डिश आणखी रुचकर बनवण्यासाठी नेहमीच्या रिफाइंड तेलाऐवजी थोडे तूप लावा. मध्यम आचेवर गरम करा. तेल पुरेसे गरम झाल्यावर कोफ्ते काळजीपूर्वक तेलात टाकून तळून घ्यावेत. ते हलके सोनेरी रंगाचे झाल्यावर टिश्यू पेपरवर काढा जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल. पूर्ण झाल्यावर, त्याच पॅनमध्ये 1 कप चिरलेला कांदा घाला आणि ते तपकिरी होईपर्यंत तळा. बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा.

स्टेप 4-

मध्यम आचेवर तवा ठेवा आणि त्यात काजू पेस्ट आणि ब्राऊन कांद्याची पेस्ट घाला. एक मिनिट परतून घ्या आणि नंतर त्यात लोणी, साखर, हिरवी वेलची पूड, मीठ घाला आणि चांगले उकळवा. नीट ढवळत असताना 2 मिनिटे शिजवा. तळलेले कोफ्ते घालून 2-3 मिनिटे उकळा. पूर्ण झाल्यावर गॅस बंद करा.

स्टेप 5-

फ्रेश क्रीम, चिली ऑइलने सजवा आणि सर्व्ह करा. ही स्वादिष्ट रेसिपी जरूर करून पहा.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.